Mumbai Water Cut: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पाणीबाणीचं संकट, मुंबईत 3 दिवस पाणीकपात, वाचा कधी आणि कुठं?

Last Updated:

Mumbai Water Cut: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 7 ऑक्टोबरपासून 3 दिवस पाणीकपात केली जाणार आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट, 3 दिवस पाणीकपात, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट, 3 दिवस पाणीकपात, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
मुंबई: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील 3 दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत सलग तीन दिवस पाणी कपात होणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार पिसे आणि पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होणार असून या काळात 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील मीटर अद्ययावतीकरणाचे काम 7, 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी दररोज दुपारी 12.30 ते 3:00 या वेळेत म्हणजेच सुमारे अडीच तास चालणार आहे. या तांत्रिक कामादरम्यान जलशुद्धीकरण प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने पाणीपुरवठा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
पाणी कपात होणारे प्रमुख विभाग
शहर विभाग:
ए विभाग: कुलाबा, कफ परेड, चर्चगेट, सीएसएमटी
बी विभाग: डोंगरी, मोहम्मद अली रोड, उमरखाडी
ई विभाग: भायखळा आणि परिसर
एफ (दक्षिण): परळ
एफ (उत्तर): माटुंगा
पूर्व उपनगरे:
एल विभाग: कुर्ला पूर्व
एम पूर्व: मानखुर्द, गोवंडी
एम पश्चिम: चेंबूर
एन विभाग: विक्रोळी, घाटकोपर
एस विभाग: भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग
advertisement
टी विभाग: मुलुंड पूर्व व पश्चिम
दरम्यान, गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा. अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ही कपात तात्पुरती असून काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पाणीबाणीचं संकट, मुंबईत 3 दिवस पाणीकपात, वाचा कधी आणि कुठं?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement