Secret Santa Gift Ideas: 'सिक्रेट सांता'साठी गिफ्ट शोधताय? मुंबईत 'या' ठिकाणी 100 ते 250 रुपयांत भन्नाट आयडिया

Last Updated:

अनेकदा प्रश्न पडतो तो, समोरच्या व्यक्तीसाठी सिक्रेट सँटासाठी काय गिफ्ट घ्यावं? तेही बजेटमध्ये... अशा वेळी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे ठिकाण सिक्रेट सँटाच्या गिफ्ट्ससाठी वरदान ठरत आहे.

+
सिक्रेट

सिक्रेट सांता गिफ्टसाठी बजेटचा प्रश्न सुटला; क्रॉफर्ड मार्केटमध्ये 100 ते 250 रुपयांत एक्सक्लुझिव्ह गिफ्ट्स

मुंबई: डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच सर्वत्र ख्रिसमस आणि सिक्रेट सांता यांची धामधूम सुरू झाली आहे. विशेषतः कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सिक्रेट सांता हा खेळ मोठ्या उत्साहात खेळला जातो. जिथे आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना किंवा टीममेट्सला गिफ्ट द्यायचे असतात. मात्र अनेकदा प्रश्न पडतो तो म्हणजे, समोरच्या व्यक्तीसाठी नेमकं काय गिफ्ट घ्यावं? आणि तेही बजेटमध्ये... महागडे गिफ्ट घ्यायची इच्छा असते, पण बँक बॅलन्स परवडत नाही. अशा वेळी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे ठिकाण सिक्रेट सांता गिफ्ट्ससाठी वरदान ठरत आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये फक्त 100 ते 250 रूपयांमध्ये अशा वस्तू मिळतात, ज्या दिसायला महागड्या आणि एक्स्पेन्सिव्ह वाटतात. यामध्ये सर्वात जास्त मागणी आहे ती इम्पोर्टेड ग्लासेसची. हे ग्लासेस वेगवेगळ्या स्टाइलमध्ये उपलब्ध असून, डेली युज, ऑफिसमध्ये वापरण्यासाठी किंवा पार्टी वेअर तसेच क्लासिक लुकसाठी योग्य आहेत. विशेष म्हणजे हे इम्पोर्टेड ग्लासेस फक्त 100 रुपयांपासून येथे मिळतात, जे सिक्रेट सांता गिफ्टसाठी एक परफेक्ट पर्याय ठरत आहेत. याचबरोबर हातात घालण्यासाठीचे ब्रेसलेट्स देखील येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये ऑक्साइड, सिल्व्हर आणि मेटल अशा तीन प्रकारचे ब्रेसलेट्स मिळतात.
advertisement
वेगवेगळ्या रंगांमध्ये, डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये असलेली ही ब्रेसलेट्स महिला आणि पुरुष दोघांसाठीही योग्य आहेत. विशेष म्हणजे ही ब्रेसलेट्स फक्त 100 रुपयांत उपलब्ध असून, दिसायला स्टायलिश आणि ट्रेंडी असल्यामुळे गिफ्ट म्हणून खूप पसंत केली जात आहेत. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बॅग्स हा देखील एक महत्त्वाचा गिफ्ट पर्याय ठरत आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये या बॅग्स फक्त 200 रुपयांत उपलब्ध आहेत. या बॅग्समध्ये कॉर्पोरेट लुकसाठी योग्य असे सिंपल डिझाईन्स, ट्रॅडिशनल लुकसाठी सूट होणाऱ्या स्टाइल्स तसेच कॅज्युअल आणि ट्रेंडी लुकसाठी परफेक्ट जाणाऱ्या बॅग्सचा समावेश आहे. त्यामुळे सिक्रेट सांता गिफ्टसाठी या बॅग्सना मोठी मागणी आहे.
advertisement
याशिवाय, सिक्रेट सांता थीमशी संबंधित खास गिफ्ट्स देखील येथे उपलब्ध आहेत. सांताक्लॉज, ख्रिसमस डेकोर, शोपीस, गिफ्ट आयटम्स आणि सजावटीच्या वस्तू 300 ते 350 रुपयांपासून येथे मिळतात. कमी बजेटमध्ये ख्रिसमसचा फील देणाऱ्या या वस्तू सिक्रेट सांता गिफ्टसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Secret Santa Gift Ideas: 'सिक्रेट सांता'साठी गिफ्ट शोधताय? मुंबईत 'या' ठिकाणी 100 ते 250 रुपयांत भन्नाट आयडिया
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement