दादरमध्ये शॉपिंग केल्यानंतर भूक लागलीये? मग ताव मारा 'या' झणझणीत नॉनव्हेज थाळीवर, टेस्ट अशी की बोटं चाखत बसाल
Last Updated:
Dadar Food Spots : दादरमध्ये शॉपिंगनंतर तुम्हालाही जबरदस्त भूक लागली असेल आणि काही तरी झणझणीत नॉनव्हेज थाळी खायची असेल तर. दादरमधील या प्रसिद्ध ठिकाणी नक्की जावा.
मुंबई : दादर म्हटलं की शॉपिंगची रेलचेल, गजबजलेले रस्ते, रंगीबेरंगी कपड्यांची दुकाने आणि सतत सुरू असलेली लोकांची गर्दी. हे सगळं तर नेहमीचंत झालं. पण या ठिकाणी फिरल्यानंतर प्रत्येकाला भूक लागणं अगदी साहजिक आहे, अशाच वेळी दादरमध्ये मिळणारी मसालेदार, गरमागरम मटण आणि चिकन थाळी हा अक्षरशः टेस्टचा ब्रेक ठरतो. या थाळीची अशी क्रेझ आहे की तिथे पोहोचताच ग्राहकांची मोठी रांग दिसते आणि थाळी मिळवण्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. मात्र, त्या प्रत्येक मिनिटाचं समाधान देणारी ही थाळी फूड लव्हर्सच्या मनात खास स्थान निर्माण करते.
ही झणझणीत नॉनव्हेज थाळी तुमच्यासाठीच
जी फक्त तुम्हाला 300 रुपयात मिळणार आहे. या अनलिमेटेट थाळीमध्ये तुम्ही मटण किंवा चिकन थाळीवर मन भरुन ताव मारू शकता. चला तर पाहूयात नेमकी ही थाळी खवय्यांना कोणत्या हॉटेलमध्ये खाण्यास मिळेल.
दादरमधील हे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे राजेशाही गोमांतक होय. या प्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये तुम्हाला पारंपरिक कोकणी तसेच महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेलं मटण किंवा चिकन, तिखट लाल रस्सा, झणझणीत काळवण, भाकरी किंवा पोळी आणि सोबत वाफाळणारा भात या सगळ्याचा परिपूर्ण मिलाफ मिळणार आहे. शिवाय त्यासोबत सोलकढी, सलाड आणि लिंहू-कांदा याही गोष्टी मिळतात, ज्यामुळे पूर्ण जेवण अधिकच रुचकर बनतं.
advertisement
शॉपिंगमुळे दमलेले ग्राहक इथल्या मटण आण चिकन थाळीच्या सुगंधानेच आकर्षित होतात. मटणाची प्रत्येक ग्रेव्ही अशी पक्की आणि मसालेदार असते की पहिलाच घास तोंडात गेल्यावर चवदारपणाचा अनुभव मिळतो. मटण अगदी मोकळं आणि नीट शिजलेलं असल्यामुळे खाणाऱ्याला प्रत्येक घास आनंद देतो. काही ठिकाणी खास घरगुती मसाल्यातलं मटण दिलं जातं, ज्यामुळे स्थानिक चवीची आठवण करून देतं.https://www.instagram.com/reel/DRT5gSbDYD2/
advertisement
दादरमध्ये शॉपिंगला येणारे लोक आता जेवणाच्या वेळेला ही मटण आणि चिकन थाळी खास खाण्यास येतात. तिथे दिवसभर गर्दी असते. विकेंडला तर रांगंच रांग लागते. विशेष म्हणजे येथे मिळणाऱ्या थाळींच्या किमतीही परवडणाऱ्या असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ऑफिसगोअर्स आणि फॅमिलीपर्यंत सर्व जण आनंदाने तिचा आस्वाद घेतात.
दादरमध्ये 'या' ठिकाणई नक्की कसं पोहोचाल?https://www.google.com/maps/dir/Dadar,+Dadar+East,+Dadar,+Mumbai,+Maharashtra+400014/Gomantak+Boarding+House,+Dadar+West,+Dadar,+Mumbai,+Maharashtra+400028/data=!4m8!4m7!1m2!1m1!1s0x3be7cedc686ee957:0xc034227259818693!1m2!1m1!1s0x3be7cedaf778daa7:0xc894a46184da810f!3e0?sa=X&ved=1t:2040&ictx=111
view commentsराजेशाही गोमंतक, दादर पश्चिम येथील खांडके बिल्डिंगमध्ये आहे. दादर स्टेशनपासून अगदी 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. जिथे तुम्ही अगदी पायी जाऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
दादरमध्ये शॉपिंग केल्यानंतर भूक लागलीये? मग ताव मारा 'या' झणझणीत नॉनव्हेज थाळीवर, टेस्ट अशी की बोटं चाखत बसाल


