Thane Crime : लिंबू सरबत देऊ का, विचारताच दारुड्यांनी फोडला बार! ठाण्यातील उच्चभ्रू परिसरातील घटना

Last Updated:

Thane Crime News : तर्राट झाल्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाचाबाचीची आठवण होताच त्यांनी लिंबूपाण्याची ऑफर करणाऱ्या वेटरचा शोध घेतला अन् जबर मारहाण केली.

Thane Crime Drunkards break into bar
Thane Crime Drunkards break into bar
Drunkards break into bar : रुसलेल्या बायकोच्या आणि दारुड्यांच्या नादी कधी लागू नये, अशी गावाकडं म्हण वापरली जाते. अशातच सध्या ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. फुल्ल तर्राट होऊन पुन्हा दारू पिण्यासाठी बारमध्ये गेलेल्या दोघांना लिंबू सरबत देऊ का, असे वेटरने विचारताच दारुड्यांनी चक्क बार फोडला असल्याची घटना ठाण्यात घडली आहे. घोडबंदर येथील उच्चभ्रू वस्तीत ही घटना घडली. दारुडे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी वेटरला देखील जबर मारहाण केली. याप्रकरणी दोन दारुड्यांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वेटरकडे दारूची मागणी केली अन्...

हिरानंदानी मेडोज परिसरातील बार दुपारी १२ ते रात्री १.३० वाजेपर्यंत सुरू असतो. रात्री ९ च्या सुमारास दोन मित्रांनी दारू पिण्यासाठी बारमध्ये प्रवेश केला. त्यांनी वेटरकडे दारूची मागणी केली. ते दोघे आधीच एका बारमधून तराट होऊन आले होते. त्यातच आणखी दारू पिण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या बारमधील वेटरने त्यांना दारूऐवजी लिंबू सरबत देऊ का, असे विचारले. त्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादानंतर दोघे दारूचे बिल भरून निघून गेले.
advertisement

झिंग चढताच वेटर टार्गेट

दोन दिवसानंतर त्यातील एकजण आपल्या पाच ते सहा मित्रांसोबत पुन्हा त्याच बारमध्ये दारू पिण्यासाठी आला. तर्राट झाल्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाचाबाचीची आठवण होताच त्यांनी लिंबूपाण्याची ऑफर करणाऱ्या वेटरचा शोध घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली. तसेच बारमधील साहित्यांची तुफान तोडफोड केली. या प्रकरणानंतर बारमालकाने चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Thane Crime : लिंबू सरबत देऊ का, विचारताच दारुड्यांनी फोडला बार! ठाण्यातील उच्चभ्रू परिसरातील घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement