MHADA: दुकान आहे की आलीशान महाल, किंमत फक्त 12,63,00,000 रुपये, मुंबईतलं लोकेशन!
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
MHADA: म्हाडातर्फे मुंबईतील 149 दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये गोरेगाव, पवई, मुलुंड, कुर्ला, बोरिवली अशा विविध भागांमध्ये असलेल्या दुकानांचा समावेश आहे.
मुंबई: महाराष्ट्र हाउसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच म्हाडातर्फे मुंबईतील 149 दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये गोरेगाव, पवई, मुलुंड, कुर्ला, बोरिवली अशा विविध भागांमध्ये असलेल्या दुकानांचा समावेश आहे. या दुकानांच्या किमती 23 लाख रुपयांपासून सुरू होते तर अगदी 12 कोटी 63 लाख रुपयांपर्यंत जाते. गेल्या लिलावात विक्री न झालेल्या गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या दुकानाचा यंदाच्या लॉटरीत देखील समावेश करण्यात आला आहे.
बँक किंवा एटीएमसाठी आरक्षित असलेल्या बिंबिसार नगरमधील या दुकानाची बेस प्राईज गेल्या लिलावात 13 कोटी 93 लाख रुपये होती. यंदाच्या लिलावात या दुकानाची बेस प्राईज कमी करण्यात आली आहे. आता या दुकानाची बेस प्राईज 12 कोटी 63 लाख रुपये ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यावर्षी या दुकानाची विक्री होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
advertisement
दुकानांची लोकेशन
म्हाडाच्या दुकानांच्या या लिलावात मुलुंड गव्हाणपाडा येथील 6, कुर्ला-चुनाभट्टी स्वदेशी मिल येथील 5, तुंगा पवई येथील 2, कोपरी पवईतील 23, चारकोपमधील 23, जुने महावीर मागाठाणे येथील 6, नगर कांदिवली पश्चिम येथील 6, प्रतीक्षा नगर येथील 9, अॅण्टॉप हिल येथील 3, मालवणीमधील 46, गोरेगाव बिंबिसार नगर येथील 17 व गोरेगावच्या शास्त्री नगर आणि सिद्धार्थ नगर, जोगेश्वरी मजासवाडी येथील प्रत्येकी एक दुकानाचा समावेश आहे.
advertisement
29 ऑगस्ट रोजी निकाल
view commentsदुकानांसाठी ई-लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्टला सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पात्र ठरलेले अर्जदार www. eauction.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलावात सहभागी होऊ शकतील. 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 9:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA: दुकान आहे की आलीशान महाल, किंमत फक्त 12,63,00,000 रुपये, मुंबईतलं लोकेशन!


