प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार? मोठी अपडेट अली समोर
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दादर हे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे जंक्शन असल्याने प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दादर रेल्वे स्थानकावर पश्चिम रेल्वेचा नवा प्लॅटफॉर्म क्रमांक 8 येणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र आता या नव्या प्लॅटफॉर्ममुळे केवळ एक क्रमांक वाढणार नाही, तर संपूर्ण प्लॅटफॉर्म क्रमांक रचनेतच मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादर हे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे जंक्शन असल्याने प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे.
सध्याची प्लॅटफॉर्म क्रमांक व्यवस्था कशी आहे?
दादर स्थानकावर सध्या पश्चिम रेल्वेच्या हद्दीत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7, तर मध्य रेल्वेच्या हद्दीत 8 ते 14 असे सलग क्रमांक आहेत. पूर्वी दोन्ही रेल्वेंमध्ये स्वतंत्रपणे 1 ते 7 असे क्रमांक असल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ होत होता. हा गोंधळ टाळण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक सलग करण्यात आले. मात्र आता पश्चिम रेल्वेच्या हद्दीत नवीन प्लॅटफॉर्म तयार होत असल्याने एकूण प्लॅटफॉर्मची संख्या वाढणार आहे.
advertisement
Mumbai News : जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा कधी सुरु होणार,तारीख आली समोर,मुंबईकरांना फायदाच फायदा
नव्या प्लॅटफॉर्ममुळे काय बदल होणार?
या नव्या प्लॅटफॉर्ममुळे पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची संख्या आठ होणार असून, त्यामुळे क्रमांक 1 ते 8 करावेत का, की नव्या प्लॅटफॉर्मला वेगळा क्रमांक द्यावा, यावर सध्या चर्चा सुरू आहे. जर पश्चिम रेल्वेचा नवा प्लॅटफॉर्म क्रमांक 8 दिला, तर मध्य रेल्वेचे सध्याचे प्लॅटफॉर्म क्रमांक पुढे सरकवावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.
advertisement
मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म क्रमांक 8 पासून सुरू होतात आणि ते प्रामुख्याने लोकल सेवांसाठी वापरले जातात. तर पश्चिम रेल्वेच्या नव्या प्लॅटफॉर्मवरून मेल आणि एक्स्प्रेस गाड्या सुटणार असल्याने, त्याला थेट क्रमांक 8 दिल्यास प्रवाशांना चुकीच्या दिशेने जाण्याचा धोका असल्याचे जाणकारांचे मत आहे.
7 A हा पर्याय चर्चेत का?
यामुळेच रेल्वे प्रशासनाकडून एक पर्याय म्हणून नव्या पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्मला 7A असा क्रमांक देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे सध्याची क्रमांक पद्धत कायम राहील आणि मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये बदल करण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, कोणताही निर्णय घेताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्पष्ट दिशादर्शक फलक, डिजिटल डिस्प्ले आणि नियमित उद्घोषणा अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. येत्या काळात रेल्वे प्रशासन याबाबत अंतिम निर्णय घेणार असून, दादर स्थानकावरील प्रवाशांना याचा थेट परिणाम जाणवणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 10:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार? मोठी अपडेट अली समोर











