Uddhav Thackeray: मुंबई पालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली खणखणीत प्रतिक्रिया, म्हणाले...
- Published by:Sachin S
Last Updated:
आमच्या पराभवाला तेज आहे, त्यांचा विजयाला डाग आहे. ज्यांचा आधार घेऊन ते महापौर बसवणार असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे"
मुंबई: 'भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही. भाजप हा कागदावर आहे जमिनीवर नाही. तो जर जमिनीवर नसता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया दिली. "आमचा महापौर होईल असा आकडा दिसत नसला तरी कुठेही शिवसैनिक खचला नाही, आमच्या पराभवाला तेज आहे, त्यांचा विजयाला डाग आहे. ज्यांचा आधार घेऊन ते महापौर बसवणार असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे" अशी टीका ठाकरेंनी केली.
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
"या निवडणूक सत्ताधाऱ्यांकडून घाणरेड्या पद्धतीने लढवल्या गेल्यात. लालूच दाखवलं, पैसे वाटप केले. आमच्या उमेदवारांना तडीपाराची नोटीस बजावली, काही जणांना दंगलीच्या गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना माघार घेण्यासाठी धमक्या दिल्यात. पण तरीही या दमदाटीला न जुमानता मतदारांनी मतदान केलं. शिवाजी पार्कवर आमची सभा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या सभेत खुर्च्यांची गर्दी होती. खुर्च्या मतदान कसं करू शकतात, याचं हे उदाहरण आहे' असं म्हणत ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.
advertisement
"शिवसेना संपवण्याचा आटोकात प्रयत्न केला. मागील ४ दिवसांमध्ये प्रचंड पैसा वाटप केला. त्यांनी अर्ध्याआधी नगरसेवक गळाला लावले होते. काही पदाधिकााऱ्यांना विकास निधीच्या नावाखाली पैसे वाटप केले. प्रचंड पैसे वाटप केले. हा पैसे येतो कुठून यामध्ये निवडणूक आयोग, ईडी सीबीआय लागत कसा नाही. २०१४ साली काळा पैसा थांबवावा यासाठी नोटबंदी केली होती, त्याचे उत्तर शोधले पाहिजे" असंही ठाकरे म्हणाले.
advertisement
'शिवसेना जमिनीवर संपणार नाही'
"भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही. भाजप हा कागदावर आहे जमिनीवर नाही. तो जर जमिनीवर नसता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. प्रचंड पैशाांच्या धबधब्या समोर मतदार झुकला नाही. २५ वर्ष आम्ही मुंबईची सेवा केली, त्यामुळे माझी काही अपेक्षा मुंबई होता. ज्या काही सेवा केली, सुधारणा केली, त्या लोकांसमोर ठेवल्या होत्या, कोविड मॉडेलची प्रशंसा झाली. मला असं वाटलं की मुंबईकर अधिक आशीर्वाद देतील. पण ठीक आहे, मतं कमी दिली नाही. पण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे. मराठी पट्यात शिवसेनेचा आशीर्वादाचा हात तसाच ठेवला आहे' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदानाचे आभार मानले.
advertisement
"शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सभागृहात जाणार आहे. या लोकांनी कशा प्रकारे भांडाफोड केला आहे, त्याचा खुलासा करणार आहे. शिवसेना, मनसे आणि पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आहे हे काम करतील, वचन नााम्याचा पाठपुरावा करणार. मुंबईची जमीन ही जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जाईल, हे सदैव दडपण मुंबई लुटणाऱ्यांवर ठेवू' असं आश्वासनही दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- ज्यांच्या आधारावर ते महापौर घडवून बसवत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे.
advertisement
- बाळासाहेबांचा विचार शिवसेनेचा महापौर बसवा हा आहे.
- भाजप च इरादा तोच आहे.
- म्हणून मी त्यांना ऍनाकोंडा म्हटलं आहे, उपमुख्यमंत्रिपद हे संविधानिक पद नाही कोण शिंदे?.
- शिवसेना भवनाचा वॉर्ड हा देखील निवडून आलेला आहे.
- शिवसेना आणि मनसे हा भेदभाव आम्हाला कुठेच दिसलेला नाही.
- जिथे जिथे भाजपचे नगरसेवक निवडून आले.
advertisement
- त्यांच्या सर्वांचे मतं एकत्र केली तर ती खूप जास्त होते.
- गेल्या वेळेस ८२ निवडून आले होते.
- 21 किंवा 22 जानेवारीला कोर्टात सुनावणी आहे.
- जर निकाल संविधानानुसार लागला तर त्यांचा उपयोग काय.
- भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा हा कधीच घेतला नाही हे त्यांचं ढोंग आहे.
- आम्ही त्यांची मतं चोरी, दुबार मतदान पकडून दिले.
advertisement
- तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या
- शुभेच्छा द्यायला मी काही शत्रू नाही.
- एवढे सर्व कर्मकांड केल्यानंतर त्यांना जी टक्कर दिलेली आहे त्यांनी आमचं कौतुक केलं पाहिजे.
- या निवडणूक आयोगावर जनता ॲक्शन घेईल त्यांनी लोकशाहीचा अपमान केलेला आहे.
- संविधानापुढे निवडणूक आयोग मोठं नाही.
- अति तिथे माती.
- २०२९ सुद्धा लांब आहे.
- काही ठिकाणी दुबार मतदानाच्या तक्रारी आलेले आहेत.
- गणेश नाईक यांचा नाव नव्हतं.
- परभणी मध्ये देखील चांगले जागा मिळाल्या.
- जिथे मी जाऊ शकलो नाही आणि त्या संदर्भात मी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.
- महानगरपालिकेची तिजोरी काम करणे या वृत्तीचे आम्ही नाही
- एका रात्रीत्र मत बदलू शकत नाही.
- मतदान एक तर्फी होईल ह्या ही वेळी तसं चित्र होतं.
- एक्सिट पोल हे जणू काही कुठल्या पक्षाच्या कार्यालयातून येत होते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 4:39 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Uddhav Thackeray: मुंबई पालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली खणखणीत प्रतिक्रिया, म्हणाले...









