जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर...; दिल्लीतून केंद्राकडे उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे, त्यांनी यावेळी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दिल्ली, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बांग्लादेशमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगभरात जनतेचा संयम सुटतोय जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. बांग्लादेशमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगभरात जनतेचा संयम सुटतोय जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, बाग्लादेशमध्ये अराजक निर्माण झालं आहे, तुम्ही जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर हिंदुंनाही संरक्षण द्या. बाग्लादेशातील हिंदूंच रक्षण करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. संयम सुटल्यावर काय होतं हे बांग्लादेशनं दाखवलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान मुंबईतील धारावीच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एका धारावीची वीस धारावी आम्ही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही लावू देणार नाही. धारावीच्या विकासाआड आम्ही नाही, पण धारावीकरांना धारावीतच घर मिळावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Aug 07, 2024 12:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर...; दिल्लीतून केंद्राकडे उद्धव ठाकरेंची मोठी मागणी







