बायकोला शेवटचा कॉल केला अन्..., नवी मुंबईत पोलिसाने घरातच संपवलं जीवन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Navi Mumbai: नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे.
उलवे (नवी मुंबई): नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोहार असं आत्महत्या करणाऱ्या ३४ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते नवी मुंबईच्या सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. पत्नीसोबत फोनवरून झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई स्वप्नील लोहार हे उलवे येथील आपल्या निवासस्थानी एकटेच होते. याचवेळी त्यांचा पत्नीशी फोनवर जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने लोहार यांना खाली उतरवलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी लोहार यांना मृत घोषित केलं.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, लोहार यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे. पत्नीसोबत नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्वप्नील लोहार यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलात आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद उलवे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 11, 2025 11:47 AM IST