advertisement

Goa Accident : गोव्यात मर्सिडीजची 4-5 वाहनांना धडक; तिघांचा मृत्यू, प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

Last Updated:

सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे, की हाय एंड कार मर्सिडीजने इतर गाड्यांना धडक दिली. मर्सिडीजने 3 ते 4 कारला जोरात धकड दिल्याने यात तिघांचा मृत्यू झाला

गोव्यात भीषण अपघात
गोव्यात भीषण अपघात
विवेक गुप्ता, पणजी 07 ऑगस्ट : रस्ते अपघातात लोकांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. अनेकदा काही चूक नसताना समोरच्याच्या चुकीमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. गोव्यातून आता अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघं गंभीर जखमी आहेत.
गोव्यात बनस्ट्रीम पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. यात 5 वाहनांची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना असा संशय आहे की पुलावर काही लोक दारू पिऊन गाडी चालवत होते. याच कारणामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत
advertisement
सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे, की हाय एंड कार मर्सिडीजने इतर गाड्यांना धडक दिली. मर्सिडीजने 3 ते 4 कारला जोरात धकड दिल्याने यात तिघांचा मृत्यू झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
गडचिरोलीतही भीषण अपघात -
भीषण अपघाताची आणखी एक घटना गडचिरोलीमधूनही समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. यात एका हायवे ट्रकचा ब्रेक फेल झाला. यानंतर हे वाहन बोलेरो कँपर वाहनावर आदळलं. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
Goa Accident : गोव्यात मर्सिडीजची 4-5 वाहनांना धडक; तिघांचा मृत्यू, प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement