Ahmedabad Plane Crash: आताची सर्वात मोठी बातमी! 133 नव्हे तर 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान टेकऑफ करताना कोसळले, 242 प्रवासी होते. मेघानी नगर परिसरात अपघात झाला, तांत्रिक बिघाड कारणीभूत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.
मुंबई: आताची सर्वात मोठी बातमी आहे. 242 प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारं विमान टेकऑफ करताना अवघ्या 10 मिनिटांत कोसळलं आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात घडली. अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. एअर इंडियाचे एक विमान टेकऑफच्या वेळी अपघातग्रस्त झाले. प्राथमिक माहितीनुसार विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला.
advertisement
यावेळी विमानात एकूण 242 प्रवासी होते. गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं विमान टेकऑफनंतर काही वेळातच कोसळलं. या विमानात 242 प्रवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, हे विमान मेघाणीनगर परिसरात कोसळलं, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अपघाताच्या ठिकाणाहून धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलासह आपत्कालीन मदत पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं.
advertisement
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की 10 किमीपर्यंत ते दिसत होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एअर इंडियाचं AI 171 विमान असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
Location :
Gujarat
First Published :
June 12, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ahmedabad Plane Crash: आताची सर्वात मोठी बातमी! 133 नव्हे तर 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं