Vijay Rupani : बायकोचं ऐकलं असतं तर बचावले असते विजय रुपाणी, पत्नीला आयुष्यभर राहणार खंत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Air India Plane Crash : या अपघातात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले. विजय रुपाणी यांनी पत्नीचे ऐकले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी माहिती आता समोर आली आहे.
अहमदाबाद : गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवासी, केबिन क्रू आणि मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील डॉक्टरांचा मृत्यू झाला. जवळपास 265 जणांचा यात मृत्यू झाला. तर, एक जण बचावला आहे. या अपघातात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले. त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय रुपाणी यांनी पत्नीचे ऐकले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी माहिती आता समोर आली आहे.
गुरुवारी सकाळी विजय रुपाणी हे गांधीनगरहून अहमदाबाद विमानतळावर रवाना झाले आणि त्यांचे पीए शैलेश मंडलिया आणि कर्मचाऱ्यांसह सकाळी 11.45 वाजता विमानतळावर पोहोचले. नेहमीप्रमाणे, टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यानंतर ते विमानात बसले. एका महिला प्रवासीने त्यांचा विमानातील फोटो पोस्ट केला होता. विमानाने उड्डाण घेताच काही मिनिटांतच हा अपघात झाला.
अपघातग्रस्त विमानात विजय रुपाणी असल्याची माहिती समोर आल्यानंतर गुजरातमध्ये त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात आली. राजकोट, मोरबी, अमरेली अशा ठिकाणांहून हजारो लोक त्यांचे स्वीय सचि मंडलिया यांना विजय रुपाणी यांच्या प्रकृतीबाबत माहिती विचारणा करत होते.
advertisement
पत्नीचे ऐकले असते तर....
विजय रुपाणी हे लंडनला त्यांच्या मुलीकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी रवाना होणार होते. त्या ठिकाणी त्यांचा मुलगा अमेरिकेहून येणार होता.
विजय रुपाणी यांनी 3 जून रोजी त्यांच्या पत्नी अंजली रुपाणी यांच्यासोबत परदेश दौऱ्यासाठी तिकिटे बुक केली होती. परंतु पंजाब आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीमुळे विजय यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला होता. त्यामुळे त्यांच्या पत्नी आधीच लंडनला पोहोचल्या होत्या. त्यांनी तिकिट रद्द करून 12 जूनसाठी तिकिटे बुक केली. रुपाणी यांनी पक्षाच्या कामासाठी प्राधान्य दिले. विजय रुपाणी यांच्या पत्नीने सोबतच लंडनला येण्याचा आग्रह केला होता. मात्र, पक्षाच्या कामासाठी त्यांनी नंतर लंडनला येण्याचा शब्द दिला. रुपाणी यांनी पत्नीचे ऐकले असते तर तिचे प्राण वाचले असते.
advertisement
विजय रुपाणी हे भाजपचे सौराष्ट्रमधील प्रभावी नेते होते. त्यांच्या निधनाने सौराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकोट ते जुनागड, जामनगर ते कच्छ अशा लोकांसाठी ते केवळ एक नेते नव्हते तर एक साधे आणि जमिनीशी नाळ असणारे मार्गदर्शक होते.
अपघाताचा तपास सुरू
DGCA आणि एअर इंडिया प्रशासनाकडून या अपघाताचा सखोल तपास सुरू असून, फ्यूल सिस्टीम, इंजिन लॉग्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या मदतीने खरी कारणं शोधली जात आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुसर्या ब्लॅक ब़ॉक्सचा शोध घेतला आहे. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
June 13, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/देश/
Vijay Rupani : बायकोचं ऐकलं असतं तर बचावले असते विजय रुपाणी, पत्नीला आयुष्यभर राहणार खंत