Ajit Pawar NCP : मोठी बातमी! अजित पवारांना मोठा धक्का, 7 आमदारांनी साथ सोडली, मुख्यमंत्र्यांकडे स्वबळावरचं बहुमत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात भूकंपाची चर्चा होत असताना आणखी एक भूकंप झाला आहे. या भूकंपाचे हादरे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना बसले आहेत.
Ajit Pawar NCP 7 MLA : राज्याच्या राजकारणात भूंकपाची चर्चा होत असताना आणखी एक भूकंप झाला आहे. या भूकंपाचे हादरे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना बसले आहेत. अजित पवारांच्या सात आमदारांना पक्षालाच रामराम केला आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा या सात जणांची भूमिका निर्णायक ठरली होती.
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (एनसीपी) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) मध्ये सामील झाले. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील NDPP ला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. या विलीनीकरणानंतर NDPP च्या आमदारांची संख्या 25 वरून थेट 32 झाली आहे. नागालँड विधानसभेतील एकूण जागा 60 आहेत.
advertisement
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यावर नागालँडमधील युनिटने अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला होता. 2023 मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवलं होतं.
NDPP आणि भाजपच्या पाठोपाठ हा पक्ष महत्त्वाचा ठरला होता. मात्र आता सात आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास निष्प्रभ झाली आहे.
advertisement
विलीनीकरणाला विधानसभा अध्यक्षांची मान्यता...
विधानसभा अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांना सातही आमदारांनी स्वतः उपस्थित राहून NDPP मध्ये विलीनीकरणाचा निर्णय कळवला. त्यांनी हे विलीनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार वैध असल्याचं मान्य करत अधिकृत मान्यता दिली.
नागालँड विधानसभा सदस्य (पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता) नियम, 2019 अंतर्गत सचिवालयाला नोंदी अद्यतनित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 01, 2025 9:39 AM IST
मराठी बातम्या/देश/
Ajit Pawar NCP : मोठी बातमी! अजित पवारांना मोठा धक्का, 7 आमदारांनी साथ सोडली, मुख्यमंत्र्यांकडे स्वबळावरचं बहुमत