Bengaluru : नेमकी चूक कुणाची? डिलिव्हरी बॉयची की बिझनेसमॅनची? Video पाहून तुम्हीच सांगा! हाणामारी CCTV कॅमेऱ्यात कैद
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bengaluru Zepto delivery boy Viral Video : सोशल मीडियावर एका झेप्टो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तो एका बिझनेसमॅनला मारहाण करताना दिसतोय.
Zepto delivery boy assaulted businessman : ऑनलाइन शॉपिंग हा लोकांच्या जीवनाचा एक दैनंदिन भाग बनला आहे. मोबाईलवर अॅप उघडलं, ऑर्डर दिली आणि काही मिनिटांतच सामान दाराशी पोहोचलं. परंतु कधीकधी वस्तूंच्या डिलिव्हरी दरम्यान (Delivery boy assaulted businessman) वादाच्या घटना देखील समोर येतात. अशीच एक धक्कादायक घटना बंगळुरूमधून समोर आली आहे. कर्नाटकात हा वाद इतका वाढला की प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. नेमकं काय झालं? नेमकी चूक कुणाची होती? जाणून घ्या.
नेमकं काय झालं?
बंगळुरूमधील एका 30 वर्षीय व्यक्तीने त्याच्या घराबाहेर किराणा माल डिलिव्हरी एजंटने त्याच्यावर शारीरिक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. 21 मे रोजी झेप्टो अॅपद्वारे दिलेल्या ऑर्डरवरून झालेल्या वादादरम्यान ही घटना घडली. तक्रार दाखल करणाऱ्या शशांकने सांगितले की, विष्णुवर्धन नावाचा एक डिलिव्हरी बॉय दुपारी 1.50 वाजता किराणा सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी त्याच्या घरी आला. गेटवर ऑर्डर घेण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी एजंट आणि शशांकच्या मेव्हणीमध्ये वाद झाल्याचे समोर आलं आहे. डिलिव्हरीच्या पत्त्यातील चुकीबद्दल वाद होता.
advertisement
चेहऱ्यावर आणि डोक्यावर वारंवार वार
डिलिव्हरी बॉयने त्याच्याशी गैरवर्तन केलं आहे, असा आरोप केला आहे. डिलिव्हरी बॉय चेहऱ्यावर आणि डोक्यावर वारंवार मुक्का मारून पळून गेला, असंही फिर्यातदार शशांकने म्हटलं आहे. शशांकने नंतर वैद्यकीय मदत घेतली आणि त्याला कवटीचे फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. जर दुखापत एका आठवड्यात बरी झाली नाही तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा विचार करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. पण नेमकी चूक कुणाची होती? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. त्याचा सीसीटीव्ही देखील व्हायरल होतोय.
advertisement
पाहा Video
A #Bengaluru businessman, has alleged he was assaulted by a #Zepto delivery agent, following an address-related dispute.
The #CCTV footage shows - there were arguments between a customer and Zepto delivery agent, following that the customer pushed the delivery agent and later… pic.twitter.com/C9cxGcyVXe
— Surya Reddy (@jsuryareddy) May 25, 2025
advertisement
दरम्यान, त्या व्यक्तीला डिलिव्हरी बॉयशी संवाद साधण्याची गरज नव्हती. महिला तिचे पार्सल घेऊन आत गेली, त्यानंतर त्या माणसाने वाद घातला. कोणताही ऑडिओ नाही, त्यामुळे काय बोलले गेले हे आम्हाला माहित नाही. ते अनादरपूर्ण आणि अपमानजनक आणि चिथावणीखोर असू शकते, असं काहीजणांनी या व्हिडीओवर म्हटलं आहे. तर काहींनी डिलिव्हरी बॉयवर आरोप केले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे आता नेमकी चूक कुणाची? हे तुम्हीच ठरवा.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
May 25, 2025 3:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
Bengaluru : नेमकी चूक कुणाची? डिलिव्हरी बॉयची की बिझनेसमॅनची? Video पाहून तुम्हीच सांगा! हाणामारी CCTV कॅमेऱ्यात कैद