Bihar Exit Poll: बिहारच्या सत्तेच्या चाव्या एनडीएकडेच पण भाजपला धक्का, जागा घटल्या; कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

Last Updated:

Bihar Exit Poll: भाजपला दुसऱ्या टप्प्यात 55 ते 65  जागा मिळण्याचा अंदाज असून, हा आकडा 2020 च्या तुलनेत किंचित कमी आहे.

News18
News18
Bihar Exit Poll:  बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यांचे मतदान पार पडलेले आहे. मतदानाच प्रक्रिया संपल्यानंतर आता येथे कोणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी बिहारमधील स्थानिक तसेच काँग्रेस आणि भाजपा यासारख्या राष्ट्रीय पक्षांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला होता. आत मतदान संपले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. News18 मेगा एक्झिट पोलने तसेच वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेमधून बिहारचा गड एनडीएच राखणार आहे.
पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाचे आकडे  गेल्या निवडणुकीच्या आकड्यांशी तुलना केल्यास भाजपच्या  जागांमध्ये घट होणार आहे. तर काँग्रेस पक्षाच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचं या पोल्समध्ये सांगण्यात आलं आहे. असं असलं तरी सत्तेच्या चाव्या मात्र भाजपकडे कायम राहणार आहेत. एकूण 243 सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी एकूण 122 जागांची गरज आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात काहीसे चित्र वेगळे दिसत आहे.
advertisement

दुसऱ्या टप्प्यात काय चित्र पाहायला मिळालं? 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही एनडीए आघाडी घेत असल्याचं चित्र दिसत आहे. एक्झिट पोलनुसार,  एनडीएला 140 ते 150 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2020 च्या तुलनेत या वेळी एनडीएचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जेडीयू सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल अशी शक्यता आहे. पक्षाला 60 ते 70 जागा मिळू शकतात, जो 2020 मध्ये मिळालेल्या 43 जागांच्या तुलनेत मोठी वाढ ठरणार आहे. भाजपला 55 ते 65  जागा मिळण्याचा अंदाज असून, हा आकडा 2020 च्या तुलनेत किंचित कमी आहे.
advertisement
एनडीएच्या मित्रपक्षांपैकी एलजेपी, एचएएमएस आणि आरएलएम हेही काही महत्त्वाच्या जागा जिंकत आघाडीला स्थिर बहुमत देण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, महागठबंधनला (एमजीबी) 85 ते 95 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो 2020 मध्ये मिळालेल्या 110 जागांच्या तुलनेत कमी आहे. आरजेडीला या वेळी 50 ते 60 जागा मिळू शकतात, जे 2020 मधील 75  जागांपेक्षा लक्षणीय घट आहे. काँग्रेसचा आकडा मात्र जवळपास तसाच राहण्याची शक्यता असून, पक्षाला 15 ते 20 जागा मिळू शकतात. तर जेएसपीला 0 ते 5  जागांपर्यंत मर्यादित यश मिळण्याचा अंदाज आहे.
advertisement

News18 मेगा एक्झिट पोल काय सांगतो?

युती 

जागा

NDA140
MGB85-95
JSP0-5
others5-10
पहिल्या टप्प्यासाठी 64.66 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यासाठीही चुरशीनं मतदान झाल्याचं दिसून आलं.दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांसाठी घेण्यात आलं. बिहार निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 122 जागांसाठी 1,302 उमेदवार रिंगणात होते. बिहार निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
advertisement
त्यामुळे बिहारच्या सत्तेची चावी राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधनकडे जाणार की भाजप-जदयू सत्ता कायम ठेवणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
बिहार निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुका आगामी अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. त्यामुळे बिहारची जनता कोणाला कौल देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Bihar Exit Poll: बिहारच्या सत्तेच्या चाव्या एनडीएकडेच पण भाजपला धक्का, जागा घटल्या; कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement