advertisement

शेती पारंपरिकच! कमी खर्चात जास्त नफा आणि लाखोंची उलाढाल

Last Updated:

योग्यप्रकारे शेती न केल्यास, त्यात तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास पारंपरिक शेतीत नुकसान होतं.

यात लागणारी मेहनत आणि वेळही इतर शेतीच्या तुलनेत कमी असते.
यात लागणारी मेहनत आणि वेळही इतर शेतीच्या तुलनेत कमी असते.
राजाराम मंडल, प्रतिनिधी
मधुबनी, 1 नोव्हेंबर : आता पारंपरिक शेती सोडून शेतकरी बांधव मोठ्याप्रमाणावर भाजीपाला, फुलझाडं आणि फळझाडांची लागवड करू लागले आहेत. शिवाय शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नफाही चांगला मिळू लागला आहे. मात्र असेही शेतकरी आहेत, जे योग्य पद्धतीने पारंपरिक शेतीतूनच उत्तम कमाई करतात. त्याचंच एक उदाहरण आपण पाहणार आहोत.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील कृषी विशेषज्ज्ञ डॉ. आशुतोष यांनी अलिकडेच आपल्या बागेत संफरचंदाची लागवड केली. ही शेती यशस्वी ठरली. त्यानंतर त्यांनी पंजाबहून आणलेल्या बासमती तांदळाची शेती करण्यात सुरुवात केली. साधारणतः इथल्या स्थानिक तांदळाची किंमत बाजारात 12 ते 16 रुपये प्रति किलो इतकी असते. तर, या बासमती तांदळाला 25 ते 30 रुपये प्रति किलोची किंमत मिळते.
advertisement
आशुतोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तांदूळ 120 दिवसांत पूर्णपणे तयार होतात. तर बासमती तांदळाच्या उत्पादनासाठी 85 ते 90 दिवस लागतात. त्यामुळे यात लागणारी मेहनत आणि वेळही इतर शेतीच्या तुलनेत कमी असते.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या शेतांना पाणी जास्त लागत असेल, त्यांनी बासमती तांदळांचं उत्पादन घेणं फायदेशीर ठरेल, असं आशुतोष सांगतात. त्याचबरोबर योग्यप्रकारे शेती न केल्यास, त्यात तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास पारंपरिक शेतीत नुकसान होतं. परंतु पंजाबचे शेतकरी योग्य पद्धतीने शेती करून याच बासमती धान्यातून लाखो आणि कोट्यवधींची उलाढाल करतात, असं आशुतोष सांगतात.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
view comments
मराठी बातम्या/देश/
शेती पारंपरिकच! कमी खर्चात जास्त नफा आणि लाखोंची उलाढाल
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement