पहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्षे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप, लग्नानंतर संसाराचं स्वप्न पाहिलं पण...; शहीद कॅप्टनच्या पत्नीचा भावुक करणारा VIDEO

Last Updated:

अंशुमन आणि स्मृती यांचं लग्न फेब्रुवारी २०२३ मध्ये झालं होतं. तर १९ जुलै २०२३ ला सियाचिनमध्ये अंशुमन हे वयाच्या २६ व्या वर्षी शहीद झाले.

News18
News18
दिल्ली : सियाचिनमध्ये देशाची सुरक्षा करताना शहीद झालेल्या कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि आईला कीर्ति चक्र देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ति चक्र स्वीकारताना अंशुमन सिंह यांच्या पत्नी आणि आईचे फोटो आता समोर आला आहे. सियाचिनमध्ये आगीच्या घटनेवेळी आपल्या सहकारी जवानांना मदत करताना अंशुमन शहीद झाले.
अंशुमन यांच्या पत्नीने त्यांची लव्हस्टोरीही सांगितलीय. लव्ह एट फर्स्ट साइट प्रेम होत. दोघेही एकमेकांना पहिल्याच नजरेत आवडले होते असं स्मृती यांनी सांगितलंय. स्मृती सिंह यांनी पती कॅप्टन अंशुमन सिंह यांच्याबाबत बोलताना संगितलं की, ते मला म्हणायचे की मी माझ्या छातीवर पीतळ घेऊन मरेन. मी सामान्य मृत्यूने मरणार नाही. ते खूप पात्र होते.
advertisement
advertisement
स्मृती यांनी दोघांची लव्ह स्टोरी सांगताना म्हटलं की,"आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं. आम्ही कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एकमेकांना भेटलो होतो. हे काही नाट्यमय नाहीय, पण पहिल्याच नजरेत प्रेम झालं. एक महिन्यानंतर अंशुमन यांची निवड आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये झाली. ते खूप इंटेलिजंट होते आणि आम्ही ८ वर्षे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर लग्नाचा विचार केला आणि लग्न केलं." अंशुमन आणि स्मृती यांचं लग्न फेब्रुवारी २०२३ मध्ये झालं होतं. तर १९ जुलै २०२३ ला सियाचिनमध्ये अंशुमन हे वयाच्या २६ व्या वर्षी शहीद झाले.
advertisement
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती यांनी सांगितलं की, दुर्दैव, लग्नाच्या दोन महिन्यांनी त्यांचं पोस्टिंग सियाचिनमध्ये झालं. १८ जुलैला आम्ही पुढच्या ५० वर्षात आपलं आयुष्य कसं असेल यावर बोललो. घर, मुलं यावर चर्चा केली. १९ तारखेला सकाळी फोन आला की ते राहिले नाहीत. पहिल्या ७-८ तासात तर आम्हाला हे स्वीकारताच आलं नाही की असंही काही होऊ शकतं. आजपर्यंत मी त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. विचार करतेय की कदाचित हे सत्य नसावं.
advertisement
आज माझ्या हातात कीर्ति चक्र घेतलं तेव्हा मला हे सत्य आहे याची जाणीव झाली. पण ते एक हिरो आहेत. आम्ही आमचं आयुष्य सावरू शकतो कारण त्यांनी खूप काही सावरलं आहे. त्यांनी आपलं जीवन आणि कुटुंबाचा त्याग केला. तीन कुटुंबांना वाचवण्यासाठी आपलं जीवन पणाला लावलं असं स्मृती सिंह म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/देश/
पहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्षे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप, लग्नानंतर संसाराचं स्वप्न पाहिलं पण...; शहीद कॅप्टनच्या पत्नीचा भावुक करणारा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement