CDS Anil Chauhan: खरंच भारताचे 6 फायटर जेट पाडले? CDS जनरल चौहान यांनी स्पष्ट सांगितलं...

Last Updated:

CDS Anil Chauhan On Indian Figheter Jet : भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या दरम्यान पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी हे भाष्य केले.

News18
News18
नवी दिल्ली:  भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या दरम्यान पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी हे भाष्य केले.
पाकिस्तानशी झालेल्या चकमकीबद्दल मुलाखतीदरम्यान महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानशी झालेल्या अलीकडील चकमकीत भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान गमावले आहे. परंतु पाकिस्तानने सहा भारतीय विमाने पाडल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, जेव्हा आम्हाला आमच्या सुरुवातीच्या चुकांबद्दल कळले तेव्हा आम्ही आमची रणनीती बदलली आणि पाकिस्तानमध्ये प्रवेश दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.
advertisement
जनरल चौहान यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, मुद्दा हा नाही की किती विमाने पाडली गेली हे नाही तर ते का पाडले गेले हा आहे. आम्हाला आमच्या चुका समजल्या, त्या दुरुस्त केल्या आणि त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा सर्व विमानांसह लांब पल्ल्याचे हल्ले केले.
त्यांनी पुढे सांगितले की, मे महिन्याच्या सुरुवातीला भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ब्राह्मोस क्षेपणास्त्रासारख्या लांब पल्ल्याच्या शस्त्रांनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय तळांना लक्ष्य केले, म्हणून भारताने 10 मे रोजी मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला आणि अनेक पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले.
advertisement
जनरल चौहान म्हणाले की या युद्धादरम्यान दोन्ही बाजूंनी संयम दाखवला आणि या युद्धामुळे अणुयुद्ध झाले नाही. भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानने युद्ध संपवण्याची मागणी केली. जनरल चौहान यांच्या विधानानंतर काँग्रेसने सरकारला या युद्धात भारताला झालेल्या नुकसानाबद्दल देशाला सत्य सांगण्यास सांगितले आहे. काँग्रेस नेते उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की, देशाला जाणून घ्यायचे आहे की कोणतेही विमान पाडण्यात आले का.
advertisement
संरक्षण तज्ञांनी असेही म्हटले आहे की सुरुवातीच्या नुकसानीनंतर भारताने आपली रणनीती बदलली आणि पाकिस्तानविरुद्ध जोरदार आघाडी घेतली. भारतीय सैन्याच्या इतिहासात हे विधान विशेष मानले जात आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या अधिकाऱ्याने उघडपणे नुकसान स्वीकारले आहे आणि रणनीती सुधारण्याबद्दल भाष्य केले आहे.
मराठी बातम्या/देश/
CDS Anil Chauhan: खरंच भारताचे 6 फायटर जेट पाडले? CDS जनरल चौहान यांनी स्पष्ट सांगितलं...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement