15 ब्रह्मोस मिसाईलने पाकिस्तानचा 'खेळ खल्लास', संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं 23 मिनिटात काय काय झालं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rajnath singh On Brahmos missile : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी भूमीवर वाढणारे दहशतवादी तळ अवघ्या 23 मिनिटांत उद्ध्वस्त केलं, असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
Rajnath singh Statement On Brahmos missile : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी गुजरात भूज हवाई दल तळाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सैनिकांचं कौतूक केलं आणि पाकिस्तानला खडेबोल सुनावले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी भूमीवर वाढणारे दहशतवादी तळ अवघ्या 23 मिनिटांत उद्ध्वस्त केलं. लोकांना त्यांचा नाश्ता पूर्ण करण्यासाठी जितका वेळ लागतो, तितका वेळ तुम्ही शत्रूंशी सामना केला आहे, असं राजनाथ सिंग म्हणाले.
रात के अंधेरे में दिन का उजाला
पाकिस्ताननेही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद मान्य केली आहे. आपल्या देशात एक जुनी म्हण आहे, "दिन में तारे देखना." भारतात निर्मित ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला 'रात के अंधेरे में दिन का उजाला' दाखवला, असंही राजनाथ सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला देखील झापलं. आयएमएफने पाकिस्तानला फंडिंग देऊ नये, असं आवाहन राजनाथ सिंग यांनी केलंय.
advertisement
मसहूद अझहरवर 14 कोटी रुपये खर्च
पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त 23 मिनिटे पुरेशी होती. मला विश्वास आहे की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या पैशाचा मोठा भाग त्यांच्या देशातील दहशतवादी पायाभूत सुविधांवर खर्च करेल. पाकिस्तान जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनाच्या आकाला म्हणजेच मसहूद अझहर याच्यावर 14 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला फंडिंग बंद करावी, अशी मागणी देखील राजनाथ सिंग यांनी केली आहे.
advertisement
#WATCH | Gujarat: Defence Minister Rajnath Singh says, "...Even Pakistan has accepted the power of BrahMos missile. There is an old saying in our country, "Din mein taare dekhna." Made in India BrahMos missile showed 'raat ke andhere mein din ka ujala' to Pakistan..."… pic.twitter.com/7iCwQ9X9fS
— ANI (@ANI) May 16, 2025
advertisement
संरक्षण मंत्र्यांनी भूज का निवडलं?
दरम्यान, गुजरातची पाकिस्तानशी असलेली सीमा ५०८ किलोमीटर लांब आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानने ड्रोन वापरून लक्ष्य केलेल्या राज्यांपैकी गुजरात एक होते. भूज पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खणखणीत उत्तर दिलंय.
Location :
Delhi
First Published :
May 16, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/देश/
15 ब्रह्मोस मिसाईलने पाकिस्तानचा 'खेळ खल्लास', संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं 23 मिनिटात काय काय झालं?