Delhi Mumbai emergency landing : हवेत बंद पडलं इंजिन, दिल्लीहून मुंबईला निघालेल्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Delhi Mumbai emergency landing : एअर इंडियाच्या AI 887 विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिल्लीला इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आली, सर्व प्रवासी सुरक्षित, एअर इंडिया तपासणी करत आहे.
दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आज पहाटे तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये हवेतच गंभीर बिघाड झाल्याने तातडीनं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सोमवारी पहाटे एअर इंडियाचे AI 887 हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी रवाना झालं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाला तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. Boeing 777-337 ER विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच उजवे इंजिन व्यवस्थित काम करत नाही हे लक्षात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या उजव्या इंजिनमधील ऑईल प्रेशर अचानक कमी झाल्यामुळे इंजिनने काम करणे बंद केलं. हवेत असताना इंजिन बंद पडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत तात्काळ नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आणि पहाटे ०६:४० वाजता विमानतळावर Full Emergency घोषित करण्यात आली. वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमान सुरक्षितपणे पुन्हा दिल्लीत उतरवण्यात आले. विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, कोणालाही इजा झालेली नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.
advertisement
या घटनेनंतर एअर इंडियाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. "तांत्रिक बिघाडामुळे आमच्या वैमानिकांनी प्रमाणित संचालन प्रक्रियेनुसार (SOP) विमान दिल्लीला परत नेण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. विमानाच्या तांत्रिक तपासणीचे काम सुरू असून, प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे," असं एअरलाइनने म्हटले आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Dec 22, 2025 10:37 AM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Mumbai emergency landing : हवेत बंद पडलं इंजिन, दिल्लीहून मुंबईला निघालेल्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग










