Bangalore Stampede : 'मला इथंच राहू द्या...', लेकाच्या कबरीला बिलगून बापाचा आक्रोश, हृदय पिळवटून टाकणारा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bangalore Father Hugged His Son Grave : 4 जून रोजी बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. 21 वर्षीय भूमिका लक्ष्मणचाही या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता.
बंगळुरू : ज्या शहराने 4 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजयाचा जल्लोष केला, त्याच शहरात एका क्षणात हा आनंद दु:खात आणि आक्रोशामध्ये बदलला. विजय मिरवणुकीत झालेल्या भीषण चेंगराचेंगरीने 11 निष्पाप जीवांचा बळी घेतला, ज्यात 21 वर्षांचा उमदा तरुण, भूमिक लक्ष्मण, याचाही समावेश होता. या घटनेने केवळ एक कुटुंबच नव्हे, तर अनेक घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच सध्या भूमिकच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ते ओक्साबोक्शी रडताना दिसतायेत.
मुलाच्या कबरीपाशी बिलगून बापाचा अश्रूतांडव
भूमिकच्या निधनाने त्याचे वडील बीटी लक्ष्मण यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे, ज्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या कबरीपाशी बिलगून रडतानाचा त्यांचा जो व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटेल. “मी त्याच्यासाठी जी जमीन खरेदी केली होती, तिथेच त्याला दफन केले. मला आता कुठेही जायचे नाही. मी पण इथेच राहू इच्छितो,” हे त्यांचे शब्द त्यांच्या मनातील असीम वेदना आणि हतबलता व्यक्त करतात. हसन जिल्ह्यातील रहिवासी असलेला भूमिक, अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच्या डोळ्यात अनेक स्वप्ने होती, जी आता कायमची मातीमोल झाली आहेत.
advertisement
प्रशासनावर गंभीर आरोप
दोन दिवसांपूर्वी भूमिकच्या वडिलांनी प्रशासनावर आपल्या भावनांचा बांध फोडला होता. "तुमच्या निष्काळजीपणामुळे आज माझा मुलगा मारला गेला," हे त्यांचे शब्द केवळ एक आरोप नव्हते, तर एका पित्याच्या अंतर्मनातून आलेला आक्रोश होता. जेव्हा ते आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात गेले, तेव्हाही त्यांच्या वेदना थांबल्या नाहीत. "बेटा न सांगता इथे आला होता आणि आता त्याची बॉडी रस्त्यावर पडली आहे," हे वाक्य त्या क्षणाची भयाणता आणि त्या पित्याची असहायता दाखवते.
advertisement
एक बाप का सबसे बड़ा दुःख...
जिस ज़मीन को उसने अपने बेटे के भविष्य के लिए खरीदा था,
आज उसी ज़मीन में वो बेटे को दफ़ना चुका है।
लक्ष्मण, कर्नाटक के हासन ज़िले से,
अब अपने 20 वर्षीय बेटे भूमिक की क़ब्र से हटने को तैयार नहीं —
क्योंकि उसका दिल, उसकी रूह… उसी मिट्टी में दफ़न हो… pic.twitter.com/32Wh4SrTaN
— Sunil Shukla (@realsunilshukla) June 7, 2025
advertisement
हत्यारे CM सिद्धरामय्या...
कर्नाटक भाजपने भूमिकच्या वडिलांचा हा हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. "हत्यारे CM सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार सर, विधानसभेच्या पायऱ्यांवर फोटो काढण्याच्या तुमच्या हट्टाने 11 कुटुंबांना दररोज अश्रूंनी हात धुवावे लागत आहेत. तुम्ही या पित्याला त्याचा मुलगा परत देऊ शकता का, जो आपल्या मुलाच्या कबरीसमोर बसून रडत आहे?" असे त्यांचे ट्वीट, या दुर्घटनेच्या राजकीय पैलूवर प्रकाश टाकते, पण त्याही पलीकडे एका कुटुंबाच्या नशिबी आलेल्या दुःखाची आठवण करून देते.
advertisement
मृत्यूची भरपाई पैशांनी?
या घटनेमुळे झालेल्या मृत्यूची भरपाई कधीही पैशांनी होऊ शकत नाही, तरीही कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी भरपाई 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, RCB आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई करून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
आयुष्यातील आनंदाला पूर्णविराम
दरम्यान, या कायदेशीर आणि आर्थिक कार्यवाहीतून गेलेला जीव परत येणार नाही, हे कटू सत्य आहे. बंगळुरूमधील या चेंगराचेंगरीने केवळ एका क्रिकेटच्या जल्लोषालाच नव्हे, तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यातील आनंदाला कायमचा पूर्णविराम दिला आहे.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
June 08, 2025 8:42 AM IST
मराठी बातम्या/देश/
Bangalore Stampede : 'मला इथंच राहू द्या...', लेकाच्या कबरीला बिलगून बापाचा आक्रोश, हृदय पिळवटून टाकणारा Video