Ind Vs Pak War : "जर तिकडून गोळी झाडली तर इथूनही गोळी झाडली जाईल",पंतप्रधान मोदींचा सैन्याला स्पष्ट संदेश

Last Updated:

भारतीय हवाई दलाकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचं हवाई दलानं मोठं वक्तव्य केलंय.

News18
News18
Ind Vs Pak War :  भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण युद्धबंदीच्या काही तासांनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या कृत्यांची पुनरावृत्ती केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिन्ही दलांच्या प्रमुखांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या बैठीकत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील उपस्थित होते. या बैठीकत वायूसेनेने स्पष्ट सांगितले की, त्यांचे ऑपरेशन सध्या सुरू आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आर्मीला  स्पष्ट सांगितले की, जर तिकडून गोळी झाडली तर इथूनही गोळी झाडली जाईल,    माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतीय हवाई दलाकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचं हवाई दलानं मोठं वक्तव्य केलंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हाला मोठं यश मिळाल्याचा दावाही हवाई दलानं केलाय. हवाई दलानं एक्सवर पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिलीय.ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ते अजूनही सुरू आहे .

काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश?

advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासा स्पष्ट सांगितले आहे की, जर तिथून गोळी आली तर इथूनही गोळी झाडली जाईल. हा संदेश पाकिस्तानला स्पष्ट आहे की कोणताही हल्ला आता सहन केली जाणार नाही. सूत्रांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. जर पाकिस्तानने आणखी हल्ला केला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल. जर त्यांनी गोळीबार केला तर आम्ही गोळीबार करू आणि जर त्यांनी हल्ला केला तर आम्ही हल्ला करू.
advertisement

पाकिस्तानने कारवाई केली तर त्याचे भयानक परिणाम होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी बेन्स यांना स्पष्ट सांगितले होते की, जर पाकिस्तानने कारवाई केली तर त्याचे भयानक परिणाम होतील. यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून 9 आणि 10 मे च्या सकाळी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले.
advertisement

भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा

10 मे रोजी 5 वाजल्यापासून युद्धबंदी करार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु संध्याकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ले सुरू केले. पण, भारताने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळत आहे. रशिया आणि जपान यांनी उघडपणे भारताच्या बाजूने समर्थन जाहीर केले आहे, तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली आहे.
मराठी बातम्या/देश/
Ind Vs Pak War : "जर तिकडून गोळी झाडली तर इथूनही गोळी झाडली जाईल",पंतप्रधान मोदींचा सैन्याला स्पष्ट संदेश
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement