Fact Check: इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू? पाक लष्कराने घडवली हत्या? पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रेस रिलीजचे सत्य काय?

Last Updated:

Imran Khan Death Fact Check: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. याबाबतचं एक पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

इम्रान खान
इम्रान खान
दिल्ली: भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धबंदीच्या करारादरम्यान, एकाच व्यक्तीची सर्वाधिक चर्चा होत आहे. ती म्हणजे इम्रान खान. शनिवारी संध्याकाळनंतर, लोक अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दल चर्चा करू लागले. ते गुगलवरही ट्रेंड करू लागले. इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता. याबाबतचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रेस रिलीजचाही समावेश होता. ज्यामध्ये असे लिहिले होते की, इम्रान खान यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. पाकिस्तानी लष्कराचे जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून ही हत्या केल्याचा दावा देखील केला जाऊ लागला? पण खरंच इम्रान खानची तुरुंगात हत्या झाली का? जाणून घेऊयात या लेखातून...
खरंतर, शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा निर्णय झाला. यानंतर काही वेळातच इम्रान खान हे नाव सोशल मीडिया आणि गुगलवर ट्रेंड करू लागले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये भीती, राग आणि गोंधळ निर्माण झाला. माजी पंतप्रधानांचा तुरुंगात मृत्यू झाल्याने जगालाही याचा धक्का बसला. इम्रान खान यांचे समर्थकही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले.
advertisement
प्रेस रिलीजमध्ये नक्की काय म्हटलं?
१० मे रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेलं एक कथित प्रेस रिलीज व्हायरल झालं. त्यात लिहिले होतं की, 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूची आम्ही अत्यंत खेदाने आणि गांभीर्याने पुष्टी करतो.' ही घटना अशा परिस्थितीत घडली ज्याची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे देशभरात आणि त्यापलीकडे संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तान सरकार या परिस्थितीचे गांभीर्य मान्य करते. या दुःखद घटनेमागील कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आम्ही पूर्ण पारदर्शकपणे याचा तपास करतो. पाकिस्तानात नेहमीच कायद्याचे राज्य आहे. या कठीण काळात देशाला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
व्हायरल प्रेस रिलीजचं तथ्य काय?
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केलेल्या कथित पत्रात इम्रान खान यांच्या मृत्यूचा दावा केला जात असला तरी या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नव्हते. इम्रान खानच्या मृत्यूचा दावा खोटा आहे. इम्रान खान जिवंत आहेत, याची पुष्टी पाकिस्तान ऑब्झर्व्हर आणि हिंदुस्तान हेराल्डसह अनेक वृत्तवाहिन्यांनी केली आहे. सध्यस्थितीत इम्रान खान हे आदियाला तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेले कथित प्रेस रिलीज खोटे आहे. असं कोणतंही पत्रक अधिकृत चॅनेलवर जारी केलं नव्हतं.
मराठी बातम्या/देश/
Fact Check: इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू? पाक लष्कराने घडवली हत्या? पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रेस रिलीजचे सत्य काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement