भारताने ती दुखती नस पकडली अन् पाकने नांगी टाकली, पाकिस्तानच्या माघारीचा Video आर्मीने दाखवला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Indian Army: भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हल्ला करून रहीमयार खान एअरबेस नष्ट केला. डीजी एअर ऑपरेशन्स ए.के. भारती यांनी हल्ल्याचा व्हिडिओ दाखवला.
नवी दिल्ली: लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानवर केलेल्या हल्लानंतर झालेल्या नुकसानीची माहिती दिली. इतक नाही तर भारतीय एअर डिफेन्स लेयर्ड ग्रिड सिस्टम किती मजबूत आहे याचा पुरावा दिला. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, डीजी एअर ऑपरेशन्स ए.के. भारती, डीजी नेव्ही ऑपरेशन्स व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराच्या शौर्याची माहिती दिली.
डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले की त्यांनी पाकिस्तानच्या निश्चित टार्गेटवर लक्ष्य साधले. यावेळी त्यांनी रहीमयार खान एअरबेसवरील हल्ल्याचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. या एअरबेसवरील रनवे पूर्णपणे नष्ट झाल्याचे भारती यांनी पुराव्यासह दाखवून दिले.
रहीम यार खान एअरबेसची दुर्दशा
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एअरबेसची अवस्था अत्यंत वाईट दिसत आहे. झुंबर लटकलेले दिसत आहेत, इमारत पूर्णपणे तुटलेली आहे, दरवाजे उखडले आहेत आणि फरशीवर मलबा पसरलेला आहे. रहीम यार खान एअरबेस पाकिस्तान वायुसेनेचे (PAF) सक्रिय लष्करी हवाई अड्डा नसला तरी तो एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ज्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे महत्त्व आहे.
advertisement
#WATCH | Delhi | The Indian military shows the debris of a likely PL-15 air-to-air missile, which is of Chinese origin and was used by Pakistan during the attack on India.
The wreckage of the Turkish-origin YIHA and Songar drones that were shot down by India has also been shown pic.twitter.com/kWIaIqnfkQ
— ANI (@ANI) May 12, 2025
advertisement
भारताचे सडेतोड प्रत्युत्तर
हा हल्ला त्यावेळी झाला जेव्हा पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. पाकिस्तानचा उद्देश भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करणे आणि नागरिकांचे नुकसान करणे हा होता. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केले. ज्यामुळे मोठे नुकसान टळले. भारताच्या सैन्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उत्तर कारवाई केली. ते म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांनी केवळ पाकिस्तानच्या निवडक लष्करी ठिकाणांनाच लक्ष्य केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 12, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/देश/
भारताने ती दुखती नस पकडली अन् पाकने नांगी टाकली, पाकिस्तानच्या माघारीचा Video आर्मीने दाखवला