माझी मुलगी सुखरूप आहे ना? जन्मदात्या पित्याने दार ठोठावलं, मिळाले काळीज चिरणारे उत्तर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Indian Women Death Sentence: भारतीय महिला शहजादी खानला अबू धाबीमध्ये फाशी देण्यात आली, ही बातमी ऐकून तिच्या वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा संघर्ष समोर आला. न्यायाच्या शोधात असलेल्या पित्याला अखेर आपल्या मुलीच्या मृत्यूचीच बातमी मिळाली.
अबू धाबीमध्ये एका चार महिन्यांच्या बाळाच्या हत्येच्या आरोपाखाली भारतीय महिला शहजादी खानला 15 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. तिच्यावर अंत्यसंस्कार 5 मार्च रोजी करण्यात येणार आहे.
वडिलांची कोर्टात धाव
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शहजादी खानच्या वडिलांनी 1 मार्च 2025 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्रालय व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी केली होती, जेणेकरून त्यांच्या मुलीच्या कायदेशीर स्थितीबाबत आणि ती सुखरुप असल्याची योग्य माहिती मिळू शकेल. परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देत सांगितले की, शहजादीला 15 फेब्रुवारीलाच फाशी देण्यात आली होती आणि यासोबतच कोर्टाने याचिका निकाली काढली.
advertisement
काय आहे संपूर्ण प्रकरण?
33 वर्षीय शहजादी खान डिसेंबर 2021 मध्ये अबू धाबीला गेली होती. ऑगस्ट 2022 मध्ये तिला एका कुटुंबाने त्यांच्या नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवले. 7 डिसेंबर 2022 रोजी बाळाला लसीकरण करण्यात आले, परंतु त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टमची शिफारस केली गेली होती. मात्र पालकांनी ती नाकारली आणि चौकशी थांबवण्यासाठी सहमती पत्रावर स्वाक्षरी केली.
advertisement
फेब्रुवारी 2023 मध्ये शहजादीचा एक व्हिडिओ समोर आला, जिथे तिने बाळाच्या हत्येची कबुली दिली होती. मात्र, तिच्या पालकांचा आरोप आहे की, ती कबुली जबरदस्ती व छळाच्या माध्यमातून मिळवण्यात आली होती.
फाशीपूर्वी शेवटचा कॉल आणि न्यायालयीन प्रक्रिया
10 फेब्रुवारी 2023 रोजी शहजादीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि 31 जुलै 2023 रोजी तिला मृत्यूदंड सुनावण्यात आला. सप्टेंबर 2023 मध्ये तिच्या शिक्षेविरोधात अपील करण्यात आले. पण 28 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयाने ती फाशीची शिक्षा कायम ठेवली.
advertisement
14 फेब्रुवारी 2025 रोजी शहजादीने आपल्या कुटुंबाला शेवटचा फोन केला आणि तिला दोन दिवसांत फाशी दिली जाईल, असे सांगितले. त्यानंतर कुटुंबाला तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
शेअर बाजारात क्रॅश नंतर कॅश! Expert केले मोठे भाकीत, शेअर्सची यादीच दिली
view commentsभारत सरकारने या प्रकरणात तिच्या मदतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र अबू धाबीतील कडक कायद्यांमुळे तिचे प्राण वाचवता आले नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 03, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/देश/
माझी मुलगी सुखरूप आहे ना? जन्मदात्या पित्याने दार ठोठावलं, मिळाले काळीज चिरणारे उत्तर


