Sonam Raghuwanshi: सोनमचे 25 दिवसात 119 कॉल्स, कोण आहे संजय वर्मा? समोर आली धक्कादायक अपडेट

Last Updated:

Indore Missing Couple: सोनमने एवढे फोन कॉल्स संजय वर्मा याला केले होते. संजय वर्माच्या एन्ट्रीने त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीच वाढले होते. अखेर पोलिसांनी या संजय वर्माचा छडा लावला आहे.

सोनमचे 25 दिवसात 119 कॉल्स, कोण आहे संजय वर्मा? समोर आली धक्कादायक अपडेट
सोनमचे 25 दिवसात 119 कॉल्स, कोण आहे संजय वर्मा? समोर आली धक्कादायक अपडेट
Raja Raghuwanshi Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक नवीन आणि महत्त्वाचे वळण आले आहे. राजाची पत्नी आणि या प्रकरणातील आरोपी सोनमने एका व्यक्तीला शंभरहून अधिक वेळा फोन केल्याचे समोर आले होते. सोनमने एवढे फोन कॉल्स संजय वर्मा याला केले होते. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीच वाढले होते. अखेर पोलिसांनी या संजय वर्माचा छडा लावला आहे. सोनमने एवढे फोन कॉल केलेला संजय वर्माची माहिती समोर आली आहे.
सोनम रघुवंशी ही आणखी एक संशयित संजय वर्मा याच्यासोबत अनेक वेळ बोलत असे. 1 मार्च ते 25 मार्च दरम्यान सोनमने संजय वर्माला 119 वेळा फोन केला होता. आता संजय वर्मा कोण आहे आणि राजा रघुवंशी प्रकरणात त्याची काय भूमिका आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
23 मे रोजी राजा रघुवंशी यांची शिलाँग येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे.
advertisement

कोण आहे संजय वर्मा?

राजा रघुवंशी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात व्यस्त असलेल्या इंदूर पोलिसांना एक मोठा सुगावा लागला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सोनम ज्या मोबाईल नंबरवर सतत बोलत असे, त्याचे नाव संजय वर्मा असे होते, तो नंबर प्रत्यक्षात तिचा प्रियकर राज कुशवाहा वापरत असे. सोनमने 25 दिवसांत 112 वेळा फोन कॉल्स केले होते.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम आणि त्या नंबरवरील व्यक्तीमध्ये दीर्घकाळ संभाषण होत असे. सोनमकडून सातत्याने केला जाणारा हा फोन क्रमांक संजय वर्मा नावाच्या व्यक्तीचा आहे. परंतु तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे हा नंबर दुसरा कोणी नसून स्वतः राज कुशवाहा वापरत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली.
राज कुशवाहा संजय वर्माच्या नावाखाली आपली ओळख लपवून सोनमशी संपर्कात होता. हा नंबर आणि त्याच्याशी संबंधित कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे आता या प्रकरणाचा पुढील तपास आणखी तीव्र करण्यात आला आहे. समोर आलेल्या या माहितीनंतर आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे.
मराठी बातम्या/देश/
Sonam Raghuwanshi: सोनमचे 25 दिवसात 119 कॉल्स, कोण आहे संजय वर्मा? समोर आली धक्कादायक अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement