पाकिस्तानला पाठिंबा देणं नडलं, तुर्कीचं कंबरडं मोडलं, बड्या कंपनीसोबतचा करार भारताने तोडला!

Last Updated:

Turkish Firm Celebi: तुर्कीची सेलेबी या कंपनीची सेवा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह नऊ विमानतळांवर कार्यरत आहे.

तुर्कीची सेलेबी कंपनी
तुर्कीची सेलेबी कंपनी
नवी दिल्ली: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) या विमान वाहतूक देखरेख संस्थेने गुरुवारी तुर्कीच्या सेलेबी एव्हिएशन होल्डिंगच्या अंतर्गत भारतातील प्रमुख विमानतळांवर कार्यरत असलेल्या सेलेबी ग्राउंड हैंडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा करार तातडीने रद्द केला आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीएएसला सेलेबीद्वारे पुरवल्या जाणाऱ्या विमान वाहतूक सेवांच्या व्यवस्थापनात काही त्रुटी आढळल्या. नागरी विमान वाहतूक हा एक संवेदनशील विभाग असून त्यात अनेक ऑपरेशन्सचा समावेश असतो आणि तुर्कीने शत्रु देशाला म्हणजेच पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने आम्ही त्यांच्यासोबतचा करार रद्द करत आहोत, असे सरकारचे म्हणणे आहे.

मुंबई विमानतळावरील ग्राउंड स्टाफ सेलेबीकडे होता

advertisement
मुंबई विमानतळावरील ग्राउंड स्टाफ हा या कंपनीच्या अंतर्गत येतो. त्यामुळे मुंबई विमानतळावरील जवळपास 70 टक्के ग्राऊंड स्टाफ ही या तुर्कीए कंपनीच्या हातात असल्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करण्यात येत होता.
बीसीएएसच्या महासंचालकांच्या मान्यतेने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, सेलेबीची सुरक्षा मंजुरी, जी मूळतः २१ नोव्हेंबर २०२२ रोजी देण्यात आली होती, ती राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने त्वरित प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. महासंचालक, बीसीएएस यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरक्षा मंजुरी राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने त्वरित प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.
advertisement

सेलेबीचा कुठे कुठे स्टाफ होता?

ही विमानतळ सेवा पुरवणारी कंपनी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह नऊ विमानतळांवर कार्यरत आहे. मुंबई, कोचीन, कन्नूर, बंगळूरु, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद आणि चेन्नई येथील प्रमुख भारतीय विमानतळांवर ही कंपनी ग्राउंड हैंडलिंग आणि कार्गो सेवा पुरवते.
सेलेबीने २००८ मध्ये भारतात कामकाज सुरू केले. त्यांच्या सेवांमध्ये प्रवासी व्यवस्थापन, रॅम्प ऑपरेशन्स, लोड कंट्रोल, फ्लाइट ऑपरेशन्स, कार्गो आणि पोस्टल सेवा, वेअरहाउस व्यवस्थापन, ब्रिज-माउंटेड उपकरणे आणि सामान्य विमान वाहतूक सहाय्य यांचा समावेश होतो. ही कंपनी भारतात दरवर्षी ५८,००० हून अधिक विमानांचे आणि ५,४०,००० टन कार्गोचे व्यवस्थापन करते, ज्यात सुमारे ७,८०० कर्मचारी कार्यरत आहेत.
advertisement

लोकांनी तुर्कीला जाऊ नये, अनेक संघटनांचे आवाहन, अर्थव्यवस्थेवर घाव घालण्याचा प्रयत्न

पाकिस्तानला पाठिंबा दर्शविल्याबद्दल आणि भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केल्याबद्दल तुर्की वस्तू आणि पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. काही ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्स आणि संघटनांनी लोकांनी तुर्कीला भेट देऊ नये, असे आवाहनही केले आहे.
मराठी बातम्या/देश/
पाकिस्तानला पाठिंबा देणं नडलं, तुर्कीचं कंबरडं मोडलं, बड्या कंपनीसोबतचा करार भारताने तोडला!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement