Air India Plane Crash Report : एअर इंडियाच्या विमानाचा अपघात की घातपात? AAIB च्या रिपोर्टनंतर मंत्री मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Air India Plane Crash AAIB Report : एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या तपासाचा प्राथमिक रिपोर्ट आल्यानंतर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी मोठी माहिती दिली आहे.
MoS Minister on Air India Plane Crash AAIB Report : अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या तपासाचा प्राथमिक रिपोर्ट आता समोर आला आहे. भारतीय विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक रिपोर्ट सादर करत मोठी माहिती दिली. या रिपोर्टमध्ये विमानाची दोन्ही इंजिन टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदांनी अचानक बंद पडली, ज्यामुळे विमान कोसळलं, असं धक्कादायक कारण या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अशातच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
AAIB चा हा प्राथमिक अहवाल आहे. याच्या आधारे आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. यापूर्वी असे अपघात झाले तर ब्लॅक बॅाक्स परदेशात पाठवावा लागायचा. आता आपणच वेगाने हे पूर्ण तपासू शकतो. एआयबी ही स्वतंत्र बॅाडी आहे. त्यात मंत्रालयातच काही हस्तक्षेप नसतो, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
advertisement
अत्यंत तोकडे संभाषण, पुढची तपासणी... - मुरलीधर मोहोळ
पायलटच्या संभाषणाच्या आधारे काही निष्कर्ष काढता येणार नाही. कारण दोन्ही पायलटमधील ते एक अत्यंत तोकडे संभाषण आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढची तपासणी आवश्यक आहे. त्या अहवालाची आपण वाट पहावी, त्यानंतर पुढील निष्कर्ष काढणं योग्य ठरेल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
advertisement
#WATCH | On AAIB's preliminary report on AI 171 crash, MoS Civil Aviation Murlidhar Mohol says," This is a primary report and the investigation is continuing. Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) is an autonomous body that is doing good work..." pic.twitter.com/sOPglp0ll8
— ANI (@ANI) July 12, 2025
advertisement
तू इंजिन का बंद केलं?, पायलटमधील संभाषण
दरम्यान, AAIB च्या 15 पानांच्या अहवालानुसार, विमानाने 180 नॉट्सचा कमाल निर्देशित एअरस्पीड (IAS) गाठला. त्यानंतर लगेचच, इंजिन-1 आणि इंजिन-2 चे इंधन कट-ऑफ स्विच 'RUN' वरून 'CUTOFF' स्थितीत हलले, ज्यामुळे इंजिन बंद झाले, अशी माहिती समोर आली आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एका पायलट दुसऱ्याला 'तू इंजिन का बंद केले?' असे विचारताना ऐकू आलंय. त्यामुळे हा अपघात होता की घातपात? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash Report : एअर इंडियाच्या विमानाचा अपघात की घातपात? AAIB च्या रिपोर्टनंतर मंत्री मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?