'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक, सैन्याच्या शौर्याला सलाम

Last Updated:

मुकेश अंबानी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाचे श्रेय भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींना दिले. रिलायन्स ग्रुप ईशान्येत ७५,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

News18
News18
नवी दिल्ली:  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे एमडी आणि अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल वक्तव्य केलं. ऑपरेशन सिंदूर यशस्वी होण्यामागे त्याचं श्रेय भारतीय सैन्यातील शूर सैनिकांना आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं. काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही लष्करी कारवाई केली. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.
advertisement
भारतीय सैन्याच्या या यशाबद्दल मुकेश अंबानी म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर'च्या मोठ्या यशाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सॅल्युट करतो. हे यश त्यांच्या दृढनिश्चयाचे आणि आपल्या सशस्त्र दलांच्या अतुलनीय शौर्याचे तेजस्वी उदाहरण आहे. भारतीय लष्कराने ९ आणि १० मे च्या मध्यरात्री पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्रे डागली आणि या मर्यादित कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
advertisement
त्यानंतर, पाकिस्तानचा प्रत्युत्तर हल्ला देखील भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला. ईशान्येत ७५,००० कोटींची गुंतवणूक करणार रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, पुढील ५ वर्षांत ईशान्येकडील त्यांची गुंतवणूक दुप्पट करण्याची त्यांची योजना आहे. गेल्या चार दशकांत, आम्ही ईशान्येकडे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
पुढील ५ वर्षांत, आम्ही ईशान्येकडे ७५,००० कोटी रुपये गुंतवू. त्यांनी जिओच्या नेटवर्क कव्हरेजचा विस्तार करणे, रिलायन्स रिटेलची खरेदी वाढवणे आणि नवीन कारखाने उभारणे यावरही भर दिला. याशिवाय, सौरऊर्जा उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्राचे आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावेल असे सांगण्यात आले आहे.
advertisement
ईशान्येकडील खरेदी देखील वाढवेल. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स रिटेल त्यांच्या व्यापक गुंतवणूक धोरणाचा भाग म्हणून ईशान्य भागातून खरेदीचे प्रयत्न वाढवण्यास सज्ज आहे. कंपनीचे या प्रदेशात सौरऊर्जा निर्मिती लक्षणीयरीत्या वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, जे या प्रदेशाच्या शाश्वत ऊर्जा विकासात योगदान देईल. याशिवाय, आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, रिलायन्सने मणिपूरमध्ये आधीच १५० खाटांचे कर्करोग रुग्णालय स्थापन केले आहे. एवढेच नाही तर, ईशान्येकडील क्रीडा प्रतिभेला चालना देण्यासाठी आम्ही ऑलिंपिक प्रशिक्षण केंद्रे देखील स्थापन करू.
advertisement
मराठी बातम्या/देश/
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक, सैन्याच्या शौर्याला सलाम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement