आता पूर असो वा भुकंप, 1 लाख कॅमेऱ्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यातील मिळेल अपडेट
- Published by:News Digital
- trending desk
Last Updated:
भारतातील एका शहरात हवामान कसं असेल? हे वेळेआधीच सांगितलं जाईल, खराब हवामानाबद्दल आधीच इशारा दिला जाईल. हे शहर आता पूर, भूकंप आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : भारतातील एका शहरात हवामान कसं असेल? हे वेळेआधीच सांगितलं जाईल, खराब हवामानाबद्दल आधीच इशारा दिला जाईल. हे शहर आता पूर, भूकंप आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या साठी अमेरिकन पेंटागॉनच्या लष्करी कमांड सेंटरसारखे दिसणाऱ्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या (ICCC) नवीन वॉर रूमचं उदघाटन तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली यांच्या हस्ते हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे.
हैदराबादच्या या नवीन वॉर रूममधून एक लाखांहून अधिक कॅमेऱ्यांच्या मदतीने शहरातील प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवता येणार आहे. एवढंच नाही तर या वॉर रूममधून रिअल टाइम ट्रॅफिकवर लक्ष ठेवता येणार असून, इथे हेलिपॅडही असणार आहे.
शहरासाठी हवामान अंदाज प्रणालीची स्थापना करण्यात आली आहे, जी गंभीर हवामानाच्या घटनांची पूर्वसूचना देऊ शकते. आपत्ती व्यवस्थापनाला पुढील स्तरावर नेऊन, ही यंत्रणा पूर, आग आणि भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते. तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली यांनी हैदराबाद येथील पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात देशातील सर्वात अत्याधुनिक ICCC च्या नवीन केंद्राचं उदघाटन केलं. येथील वॉर रुममध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत ज्या आपत्तीच्या वेळी सर्व ऑपरेशन्स केंद्रीय पद्धतीने नियंत्रित करण्यास सक्षम आहेत.
advertisement
आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर उड्डाण करण्यासाठी आणि उतरवण्यासाठी इमारतीवर हेलिपॅडही बांधण्यात आलं आहे. ही वॉर रूम विविध प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामध्ये संपूर्ण शहरात एक लाखांहून अधिक कॅमेऱ्यांच्या मदतीने व्हिडिओंच्या माध्यमातून देखरेखीचा समावेश आहे. वॉर रुममध्ये ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे, जी हैदराबादमधील वाहनांच्या हालचालींना रिअल टाइममध्ये ट्रॅक करू शकते.
advertisement
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हैदराबाद ICCC चे उदघाटन केले होते. पाच ब्लॉक असलेल्या या केंद्राच्या बांधकामासाठी राज्य सरकारने अंदाजे 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. टॉवर ए मध्ये बेसमेंटसह 19 मजले आहेत. टॉवर बी मध्ये दोन बेसमेंट मजल्यांच्या वर 15 मजले आहेत. टॉवर सी मध्ये बेसमेंटवरील सभागृहासह तीन मजले आहेत. टॉवर डी मध्ये बेसमेंटसह दोन मजले आहेत. टॉवर ई मध्ये, CCC चौथ्या आणि सातव्या मजल्यांच्या दरम्यान आहे.
advertisement
टॉवर ए सर्वात उंच आहे, त्यात 20 मजले आहेत. डीजीपींची रूम चौथ्या मजल्यावर आहे. हैदराबाद पोलीस आयुक्तांची रुम 18 व्या मजल्यावर असून, इतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या रुम्स सातव्या मजल्यावर आहेत.
Location :
Hyderabad,Telangana
First Published :
September 26, 2023 2:30 PM IST