Pahalgam Terror Attack : पत्नीशी बोलताना गोळीबाराचा आवाज आला, नवऱ्याच्या काळजात धस्स झाले अन्...

Last Updated:

Pahalgam Terror Attack : पहलगामध्ये असलेल्या पत्नीसोबत फोनवर बोलताना अचानक गोळीबाराचा आवाज ऐकला आणि चिंता वाढली असल्याचे जळगावातील तुषार वाघुळदे यांनी सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजली आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यातील 100 हून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. पहलगामध्ये असलेल्या पत्नीसोबत फोनवर बोलताना अचानक गोळीबाराचा आवाज ऐकला आणि चिंता वाढली असल्याचे जळगावातील तुषार वाघुळदे यांनी सांगितले.

अन् काळजात धस्स झाले...

तुषार वाघुळदे यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना सांगितले की, माझी पत्नी तिच्या मैत्रिणींसोबत काश्मीर फिरायला गेल्या आहेत. परवा त्यांनी गुलबर्ग सोनबर्ग हा परिसर बघितला. पत्नी आणि तिच्या मैत्रिणी या पहलगाममधील बैसरनमध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पत्नी किशोरी वाघुळदेने इकडं गोळीबार सुरू असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर तिने घाईत फोन कट केला.
advertisement
तुषार वाघुळदे यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व पर्यटकांना इंडियन सैन्य दलाने सुरक्षित कवच देत सुरक्षित जागी हलवले. रात्री त्यांनी मुक्काम केला असून आता ते आज कटरा येथे माता वैष्णो देवीचे दर्शन घेणार आहे. ती स्वतः कौन्सिलर आहे. त्यामुळे तिने या घटनेनंतर इतर पर्यटकांनाही धीर दिला.

जवानांनी संरक्षण दिले....

अचानक गोळीबार सुरू झाल्यामुळे सैन्य दलाने तिथे अचानक धाव घेतली. त्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले. किशोरी यांनी पती तुषार यांना सांगितले की, या सर्व पर्यटकांना आर्मीच्या वाहनामागे लपवले. थोड्या वेळानंतर परिस्थिती आटोक्यात आल्यावर सर्वांना सुरक्षित जागी हलवले. आज ते कटराला वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आपला प्रवास पुन्हा सुरू करणार आहेत, अशी माहिती पहेलगाम येथे अडकलेल्या पर्यटक यांचे पती तुषार वाघुळदे यांनी दिली.
advertisement

इतर संबंधित बातमी: 

view comments
मराठी बातम्या/देश/
Pahalgam Terror Attack : पत्नीशी बोलताना गोळीबाराचा आवाज आला, नवऱ्याच्या काळजात धस्स झाले अन्...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement