पाकिस्तानी जनतेला वाऱ्यावर सोडलं, लष्करप्रमुख बंकरमध्ये लपला, मिसाईल हल्ल्यानंतर काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारताने जेव्हा पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला केला. तेव्हा पाकिस्तानचा लष्करप्रमुख स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळल्यानंतर आता पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारताने जेव्हा पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला केला. तेव्हा पाकिस्तानचा लष्करप्रमुख स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास दोन तासांसाठी लष्कर प्रमुखांना बंकरमध्ये हलवण्यात आलं होतं, अशी माहिती उच्च पदस्थ सरकारी सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना रावळपिंडी येथील जनरल मुख्यालय (GHQ) संकुलातील एका मजबूत बंकरमध्ये हलवण्यात आले. अहवाल असे दर्शवितात की मुनीर किमान दोन तास बंकरमध्येच राहिले. दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील निवडक लष्करी तळांवरवर हल्ला केला.
खरं तर, दोन्ही देशांत संघर्ष सुरू झाल्यानंतर जनरल मुनीर हे सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठावठिकाणाबद्दल विविध अफवा पसरल्या आहेत. त्यानी आपल्या कुटुंबासह देश सोडल्याचा अंदाज देखील सोशल मीडियावर वर्तवला जात आहे. रावळपिंडीजवळील नूर खान एअर बेसवर झालेल्या अभूतपूर्व क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षा वर्तुळात अशी अटकळ बांधली जात आहे, की पाकिस्तान लष्करप्रमुखांचा ऑपरेशनल बेस स्थलांतरित करण्याचा विचार सुरू आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या लष्करी कमांडमध्ये असुरक्षिततेची वाढलेली भावना अधोरेखित करतो.
advertisement
ज्यावेळी भारताकडून पाकिस्तानच्या धोरणात्मक एअरलिफ्ट आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन्ससाठी महत्त्वाचं केंद्र असलेल्या नूर खान एअरबेससह सिंधमधील अनेक एअरबेसना लक्ष्य करण्यात आलं. यात संबंधित एअर बेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एकीकडे भारताकडून हल्ला होत असता, पाकिस्तानचा लष्कर प्रमुख पाकिस्तानी जनतेला वाऱ्यावर सोडून थेट बंकरमध्ये लपल्याची माहिती समोर आल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
Location :
Delhi
First Published :
May 12, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/देश/
पाकिस्तानी जनतेला वाऱ्यावर सोडलं, लष्करप्रमुख बंकरमध्ये लपला, मिसाईल हल्ल्यानंतर काय घडलं?