शस्त्रसंधीनंतर फक्त 30 मिनिटांनी पाकिस्तानला बसला पहिला शॉक; काहीच वाकडं करू शकलं नाही...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India Pakistan News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या एस-४०० वरील हल्ल्याच्या आणि इतर नुकसानीच्या दाव्यांना स्पष्टपणे खोटे ठरवले.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करण्याची तयारी दाखवली आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांनी पद्धतशीरपणे पाकिस्तानने पसरवलेल्या खोट्या गोष्टी उघड केल्या आणि सत्य काय आहे ते सांगितले.
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांनी शनिवारी पाकिस्तानच्या दाव्यांचे खंडन केले आणि ते खोटे तसेच केवळ खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचे असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानने भारताच्या अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणाली एस-४०० वर हल्ला केल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे कर्नल कुरैशी यांनी ठामपणे सांगितले.
शस्त्रसंधीच्या घोषणेने भारतात एकच खळबळ, काँग्रेस नेत्याच्या मागणीने सर्वांच्या..
कर्नल कुरैशी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, एस-४०० प्रणालीला कोणतेही नुकसान झालेले नाही आणि पाकिस्तानची कोणतीही क्षेपणास्त्रे आपल्या लक्ष्यांपर्यंत पोहोचू शकली नाहीत. याउलट भारताने केलेल्या जोरदार प्रत्युत्तरात पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांच्या अनेक लष्करी ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
advertisement
भारताच्या मोठ्या विजयानंतर पाकिस्तान गुडघ्यावर...; शस्त्रसंधी का मान्य केली
पाकिस्तानने केलेल्या खोट्या दाव्यांचा पाढा वाचताना कर्नल कुरैशी म्हणाल्या, पाकिस्तानने असा दावा केला आहे की त्यांच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी आमचे एस-४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केले आहेत. जो पूर्णपणे असत्य आहे. दुसरे म्हणजे त्यांनी असा चुकीचा माहितीचा प्रसार केला आहे की सिरसा, जम्मू, पठानकोट, भटिंडा, नलिया आणि भुज येथील आमच्या हवाई अड्ड्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचा हा दावाही पूर्णपणे निराधार आहे.
advertisement
याशिवाय पाकिस्तानच्या चुकीच्या माहिती अभियानाचा उल्लेख करत कर्नल कुरैशी म्हणाल्या, पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारुगोळा डेपोंचे नुकसान झाले आहे. हे देखील पूर्णपणे खोटे आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तातडीने शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
भारतीय लष्कराने कोणत्याही धार्मिक स्थळांना लक्ष्य केले नाही, हे स्पष्ट करताना कर्नल कुरैशी म्हणाल्या, पाकिस्तानने भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोप लावला आहे. मी हे स्पष्ट करू इच्छिते की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आमचे सैन्य भारताच्या घटनात्मक मूल्यांचे एक सुंदर प्रतिबिंब आहे.
advertisement
कर्नल कुरैशी यांच्या या स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीच्या अभियानाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय लष्कर आपल्या सीमा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज असून कोणत्याही प्रकारच्या धोक्याला तोंड देण्यासाठी सक्षम आहे असा इशारा पुन्हा एकदा पाकिस्तानला दिला गेला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/देश/
शस्त्रसंधीनंतर फक्त 30 मिनिटांनी पाकिस्तानला बसला पहिला शॉक; काहीच वाकडं करू शकलं नाही...