पोलीस निरीक्षकाचे दुर्लक्ष ठरले जीवघेणे, Vaccinated कुत्र्याने ओरखडले, इंजेक्शन न घेतल्याने 5 दिवसात शॉकिंग मृत्यू
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Police Inspector Died Of Rabies: अहमदाबादमध्ये पाळीव कुत्र्याच्या क्षुल्लक ओरखड्याने पोलीस निरीक्षक वानराज मंजारिया यांचा रेबिजने मृत्यू झाला आहे. चावा नाही तरीही ओरखड्याने रेबिजचा प्राणघातक संसर्ग होऊ शकतो, या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे सावट पसरले आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहर पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वानराज मंजारिया यांचा रेबिजमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या पाळीव कुत्र्याच्या नखांच्या ओरखड्यांमुळे त्यांना रेबिजचा संसर्ग झाला होता.
मंजारिया यांनी घटनेनंतर कोणतीही काळजी घेतली नाही, कारण सर्वसामान्यांमध्ये असा समज आहे की रेबिज केवळ कुत्र्याच्या चावण्याने होतो, नखांच्या ओरखड्याने नाही. मात्र त्यांची चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
रेबिज हा लायसाव्हायरस (Lyssavirus) या विषाणूमुळे होतो. रस्त्यावरच्या (भटक्या) प्राण्यांच्या चाव्यामुळे किंवा ओरखड्यामुळे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. हा विषाणू थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करतो. रेबिजची लक्षणे म्हणजे ताप, चिंताग्रस्तता, गोंधळ, गिळताना अडचण येणे तसेच भास (हॅल्युसिनेशन) दिसणे अशी असतात.
advertisement
भारतामध्ये रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 75 टक्के घट नोंदवली गेली असली तरी यंदाच्या सुरुवातीला लॅन्सेटच्या अभ्यासानुसार देशभरात दरवर्षी किमान 5726 लोकांचा मृत्यू रेबिजमुळे होतो. त्यामुळे रेबिज मृत्यूंच्या बाबतीत भारत हा जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे.
advertisement
अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की देशात दरवर्षी सुमारे 9 दशलक्ष (90 लाख) प्राण्यांच्या चाव्याचे प्रकार नोंदवले जातात. यापैकी दोन तृतीयांश घटना कुत्र्यांच्या चाव्याच्या असतात आणि त्याच्यामुळे रेबिजचा प्रसार सर्वाधिक होतो.
advertisement
गेल्या महिन्यातच कर्नाटकमधील दावणगेरे येथे चार वर्षांची मुलगी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर रेबिजच्या संसर्गाने मरण पावली. कर्नाटक राज्यात यंदा आतापर्यंत 2.86 लाख कुत्र्यांच्या चाव्याचे प्रकार आणि 26 संशयित रेबिज मृत्यू नोंदवले गेले आहेत.
advertisement
ऑगस्ट महिन्यात ओडिशामध्ये देखील रेबिजची दोन प्रकरणे नोंदली गेली. त्यापैकी एक 33 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अॅथलिट आणि दुसरे 48 वर्षीय शेतकरी होते. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांनाही चावणीनंतर लसीकरण (पोस्ट-बाईट व्हॅक्सिन) करण्यात आले होते, तरीसुद्धा ते रेबिजच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/देश/
पोलीस निरीक्षकाचे दुर्लक्ष ठरले जीवघेणे, Vaccinated कुत्र्याने ओरखडले, इंजेक्शन न घेतल्याने 5 दिवसात शॉकिंग मृत्यू