Rahul Gandhi : 'क्रोनोलॉजी समझें..., 3-4 जूनमध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा', राहुल गांधींचा आरोप, JPC ची मागणी
- Published by:Shreyas
Last Updated:
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीच्या काळात मोदी आणि अमित शाह यांनी शेअर मार्केटवर भाष्य केलं. खोट्या एक्झिट पोलचा मार्केटवर परिणाम झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीच्या काळात मोदी आणि अमित शाह यांनी शेअर मार्केटवर भाष्य केलं. खोट्या एक्झिट पोलचा मार्केटवर परिणाम झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदी आणि शाहांनी निवडणुकीच्या काळात शेअर मार्केटवर भाष्य का केलं? असा थेट सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. खोटे एक्झिट पोल आणि भाजपचा काय संबंध आहे? असा थेट सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला. सरकारने शेअर मार्केटबाबत संभ्रम निर्माण केल्याने गुंतवणुकदारांचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याचंही राहुल गांधी म्हणालेत. दरम्यान, या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी झाल्याची मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि एक्झिट पोल मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. एक्झिट पोलमुळे शेअर बाजारात लोकांचं 30 लाख कोटींचं नुकसान झालं, याची क्रोनोलॉजी समजून घ्या. पहिल्यांदा पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी स्टॉक मार्केटवर टिप्पणी केली. स्टॉक मार्केट जलद गतीने पुढे जाणार आहे, असं पंतप्रधान म्हणाले. गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनीही अशीच वक्तव्य केली, यामुळे बाजारात तेजी आली आणि नंतर बाजार बुडला. हा एक घोटाळा आहे. याची जेपीसीकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
advertisement
'शेअर बाजारात भ्रम पसरवला गेला. पूर्ण प्रकरणाची जेपीसी चौकशी झाली पाहिजे. एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे. भारतातल्या शेअर बाजारातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली गेली पाहिजे' असं राहुल गांधी म्हणाले. याविरोधात कोर्टात जाणार का? असं विचारलं असता आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं.
advertisement
'निवडणुकीआधीही भाजपचे इंटरनल सर्व्हे त्यांना 220 जागा दाखवत होत्या. एक्झिट पोलनंतर एक भ्रम पसरवला गेला. यानंतर 3 जूनला शेअर बाजारने रेकॉर्ड तोडला आणि खूप उंचावर गेला. हा एक स्कॅम आहे, पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यासाठी जबाबदार आहेत', असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
June 06, 2024 6:21 PM IST
मराठी बातम्या/देश/
Rahul Gandhi : 'क्रोनोलॉजी समझें..., 3-4 जूनमध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा', राहुल गांधींचा आरोप, JPC ची मागणी