सोनमची एक घोडचूक अन् सासूला आधीच आला होता संशय, हनिमूनला गेल्यावर काय झालं? राजाची आई म्हणाली...

Last Updated:

Raja Raghuvanshi Mother doubt on sonam : शिलाँगमध्ये झालेल्या हत्येनंतर बेपत्ता झालेल्या इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम 17 दिवसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका ढाब्यावर सापडली. अशातच राजाच्या आईने मोठा खुलासा केलाय.

Raja Raghuvanshi Mother doubt on sonam
Raja Raghuvanshi Mother doubt on sonam
Raja Raghuvanshi Murder Case : गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील एका ढाब्यावर सापडली आहे. अशातच आता या प्रकरणात (Indore Couple Missing Case) धक्कादायक खुलासा झाला आहे. सोनमनेच आपल्या पतीची हत्या केल्याची हादरवणारी माहिती समोर आलीये. मेघालय पोलिसांनी सोनमला आरोपी ठरवलं असून तिनेच हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, आता सोनमने नवऱ्याची हत्या केली का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच सोनमची सासू उमा रघुवंशी (Raja Raghuvanshi mother) यांनीही एक मोठा खुलासा केला आहे.

सोनमच्या सासूचा खुलासा

उमा म्हणाल्या की, तिला सोनमवर आधीच संशय होता, पण तेव्हा तिला काहीही समजलं नाही. सोनमने शिलाँगला जाण्याचा आधीच प्लॅन केला आहे तेव्हा तिला तिच्यावर संशय आला. तिनं आधीच तिकिटे बुक केली होती आणि हे तिनं कोणालाही सांगितलं नव्हतं, असं सोनमच्या सासून सांगितलं आहे. तिचा मुलगा सुरुवातीपासूनच काश्मीरला जायचा होता. त्याने तिला आधीही अनेकदा सांगितले होते, पण तिथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा प्लॅन होऊ शकला नाही. त्यानंतर कामाख्याला भेट देण्याचा प्लॅन बनवण्यात आला, असंही राजाच्या आईने म्हटलंय.
advertisement

शिलाँगला जाण्याचा प्लॅन केला पण...

जेव्हा दोघांनी अचानक शिलाँगला जाण्याचा प्लॅन केला तेव्हा मुलाने फोन केला. त्याने सांगितले की सोनमने आधीच सर्व प्लॅन बनवले होते. जबाबदारांना मृत्युदंड मिळाला पाहिजे. जर सोनमने हे केले असेल तर तिलाही शिक्षा झाली पाहिजे. सोनम नेहमीच आमच्याशी चांगले वागली - आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही की ती हे करू शकते, असंही राजाच्या आईने म्हटलं आहे.
advertisement

सोनमने राजाला मारले असेल तर...

फोन कॉल दरम्यानही आम्हाला काहीही चूक झाली आहे याची कल्पना नव्हती. जर सोनमने खरोखरच राजाला मारले असेल, तर मला सर्वात कठोर शिक्षा हवी आहे - मृत्युदंड. पण जर तिने ते केले नसेल, तर मी तिला खोटे दोष देणार नाही. मी तिला माझ्या स्वतःच्या मुलीसारखे वागवले; तिचे वर्तन नेहमीच चांगले होते, असंही सोनमची सासू म्हणाली. माझा राजाशी शेवटचं बोलणं झालं तेव्हा तो नीट बोलत नव्हता. केळी खातोय, असं सांगत होता. त्यामुळे मला डाऊट आला. पण मला वाटतंय त्यानंतरच त्याच्यासोबत काहीतरी झालं असावं, असं सोनमे म्हटलं आहे.
advertisement
advertisement
सोनमची आई संगीता रघुवंशी म्हणाली आहे की, तिने तिच्या मुलीचे लग्न राजा रघुवंशीशी तिच्या संमतीनेच केलं. दोघंही एकमेकांशी बोलत असतं, हजारो वेळा एकत्र बाहेर जायचे. आता तिला अचानक काय झालं? हे समजत नाही, असं सोनमची आई म्हणाली. सोनमने कोणत्याही दबावाखाली लग्न केले नाही. तिच्यावर दबाव कसा आणता येईल, तिने कोणाचेही ऐकले नाही. लग्नापूर्वी राजा आणि सोनम कपडे वगैरे खरेदी करायला जायचे. राजा फोन करून म्हणायचा की चला खरेदीला जाऊया, मग दोघेही जायचे. मग सहमती कशी होणार नाही? असा सवाल सोनमच्या आईने विचारला आहे.
मराठी बातम्या/देश/
सोनमची एक घोडचूक अन् सासूला आधीच आला होता संशय, हनिमूनला गेल्यावर काय झालं? राजाची आई म्हणाली...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement