Road accident: ट्रक आणि ट्रेलरचा भीषण अपघात, 13 जणांचा जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात एकाच कुटुंबातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. छठी कार्यक्रमात सहभागी होऊन हे कुटुंब परतत असल्याचे सांगण्यात येत आहे.
काळाने घात केला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं, रात्री एक दोन नाही तर 13 जणांचा मृत्यू झाला संपूर्ण गावावर शोककळा पसरली. ट्रक आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. 12 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच, ग्रामस्थ आणि पोलिसांनी जखमींना स्थानिक खारोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात एकाच कुटुंबातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. छठी कार्यक्रमात सहभागी होऊन हे कुटुंब परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान हा दुर्दैवी रस्ता अपघात घडला. कुटुंब छठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. चटौड परिसरातील रहिवासी पुनीत साहू यांचे नातेवाईक त्यांच्या घरी छठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मालवाहू गाडीने आले होते.
advertisement
कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण घरी परतत होते. त्यानंतर रायपूर-बालोदाबाजार रोडवरील सारागावजवळ एका ट्रेलरने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात ९ महिला, २ तरुणी, १ तरुण आणि ६ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी १३ जणांच्या मृत्यूची नोंद केली. १२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्र खरोरा आणि वैद्यकीय महाविद्यालय रायपूर येथे पाठवण्यात आले आहे.
advertisement
या दुःखद घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी आणि जिल्हा प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालवाहू डब्यात ५० हून अधिक लोक प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक प्रथम ट्रेलरला धडकला आणि नंतर तो दुसऱ्या ट्रेलरला धडकला. या धडकेनंतर १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. छत्तीसगडमधील रस्ते जीवघेणे आहेत साडेचार महिन्यांत ५१३ रस्ते अपघात रस्ते अपघातात १८९ जणांना आपला जीव गमवावा लागला काल रात्री खारोरा रोडवर १३ जणांना आपला जीव गमवावा लागला.
advertisement
#WATCH | रायपुर, छत्तीसगढ़ | रायपुर-बलोदाबाजार रोड पर सारागांव के पास एक छोटे ट्रक और ट्रेलर के बीच हुई टक्कर की घटना पर रायपुर के कलेक्टर गौरव कुमार सिंह ने बताया, "...रात 12 बजे के आस-पास हमें हादसे की सूचना मिली थी... तत्काल प्रशासन की टीम सक्रिय हुई और घायलों को पास ही के… pic.twitter.com/Rm0pC7VfGt
— ANI_HindiNews (@AHindinews) May 11, 2025
advertisement
हा अपघात छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सोमवारी पहाटे एक भीषण रस्ता अपघात झाला. याआधी ६ मार्च रोजी एका कारने ट्रकला धडक दिली, ५ जणांचा मृत्यू १३ मार्च रोजी दोन रस्ते अपघातात ९ जणांना आपला जीव गमवावा लागला महासमुंदमध्ये एका ट्रकने कारला धडक दिली, ६ जणांचा मृत्यू बेमेटारामध्ये ३ जणांना आपला जीव गमवावा लागला ३ मे रोजी सीतापूरमध्ये एका रस्ते अपघातात ३ जणांचा मृत्यू ११ मे रोजी दोन रस्ते अपघातात ३ जणांचा मृत्यू
Location :
First Published :
May 12, 2025 7:37 AM IST