Crime Video : लायब्ररीत घड्याळ्याच्या काट्याची शांतता, अचानक सात जण घुसले अन्... CCTV फुटेजने खळबळ!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Student Beaten in library Viral Video : ग्रंथालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला काही हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. जखमी विद्यार्थ्या तरुण शर्माला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Student Beaten in library CCTV footage : ग्रंथालयात कागदं पटलण्याचा आवाज, घड्याळ्याच्या काट्यांची शांतता होती... पुस्तकात मान घालून पोरं अभ्यास करत होती. तेवढ्यात काही पोरं ग्रंथालयात आली अन् एका मुलाला धरलं. मागून दोघं तिघं आली आणि दुसऱ्या पोराची कॉलर धरली. नेमकं काय झालं? कुणाच्याच लक्षात येईना. तेवढ्यात सात पोरांनी लायब्ररीत धिंगाणा घातला. बाहेरून आलेल्या पोरांनी अभ्यास करत असलेल्या पोरांना धु धु धुतलं. खुर्चीने आणि लाकडाने बेदम मारहाण केली. त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
हल्लेखोरांची बेदम मारहाण
करौली येथील हिंडौन शहरातील वर्धमान नगर येथील ग्रंथालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला काही हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. जखमी विद्यार्थ्या तरुण शर्माला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पाहा Video
advertisement
राजस्थान के करौली में लाइब्रेरी में पढ़ रहे हैं स्टूडेंट के साथ मारपीट, घटनाक्रम सीसीटीवी कैमरे में कैद @RajPoliceHelp pic.twitter.com/uZWP1P0mBP
— Naresh Sarnau (Bishnoi) (@NSarnauaajtak) May 18, 2025
दुसऱ्या विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला
तक्रारदार रविकांत शर्मा यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा तरुण शर्मा दररोज वाचनालयात अभ्यास करण्यासाठी जातो. दोन दिवसांपूर्वी, 16 मे रोजी, सचिन गुर्जर तिघारिया आणि त्याच्या इतर सहा साथीदारांनी ग्रंथालयात घुसून तरुण आणि दुसऱ्या विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला केला. घरी परतल्यानंतर, जेव्हा विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली, तेव्हा चौकशी केल्यावर त्याने संपूर्ण घटना त्याच्या कुटुंबाला सांगितली. सदर घटना राजस्थानमधील करौलीमधील आहे.
advertisement
लायब्ररी ऑपरेटरची चौकशी
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लायब्ररी ऑपरेटरला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
Location :
Rajasthan
First Published :
May 18, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/देश/
Crime Video : लायब्ररीत घड्याळ्याच्या काट्याची शांतता, अचानक सात जण घुसले अन्... CCTV फुटेजने खळबळ!