Train Fire: मोबाईलमुळे धावत्या रेल्वेच्या डब्यानं घेतला पेट, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
काळजाचा थरकाप! धावत्या जनसेवा एक्सप्रेसच्या डब्याला मोबाईलमुळे आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या उड्या
धावत्या ट्रेनमध्ये अचानक स्फोटाचा आवाज झाला. त्यानंतर आग लागली, पुढच्या क्षणात आगीनं रौद्र रुप धारण केलं, ट्रेनच्या डब्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. लोकांनी जीव वाचवण्यासाठी अक्षरश: ट्रेनमधून उड्या टाकल्या. ही धक्कादायक घटना जनसेवा एक्सप्रेसमध्ये घडली. प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग अगदी अंगावर काटा आणणारा होता. राजस्थान आणि आंध्र प्रदेशमधील बसला आग लागल्याची घटना ताजी असताना आता ट्रेनच्या डब्यात आग लागली.
अमृतसरहून सहरसाकडे जाणाऱ्या जनसेवा एक्सप्रेस (गाडी क्रमांक १४६१८) च्या एका बोगीमध्ये अचानक आग लागली. आग लागल्याचे पाहून प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. ही घटना सहरसातील सोनवर्षा कचहरी रेल्वे स्टेशनजवळ घडली, जेव्हा ट्रेन आपल्या निर्धारित वेगाने पुढे जात होती. अचानक एका बोगीमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. बिहारच्या सहरसा इथे शुक्रवारी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement

एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही प्रवास करत असताना, एका प्रवाशाचा मोबाईल ब्लास्ट झाला आणि क्षणार्धात आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले आणि अनेक लोक भाजले." ही आग इतर बोग्यांमध्ये पसरण्याच्या भीतीने आणि जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून बाहेर उड्या मारण्याचा प्रयत्न केला.
advertisement
#बिहार #सहरसा: मानसी रेलखंड के सोनबरसा कचहरी स्टेशन पर जनसेवा एक्सप्रेस ट्रेन के जनरल कोच में अचानक लगी आग।
▶️कुछ यात्री झुलसने से जख्मी।
रिपोर्ट-आरती कुमारी@RailMinIndia @spjdivn pic.twitter.com/zRR0nrDocl
— आकाशवाणी समाचार, पटना (@airnews_patna) October 25, 2025
advertisement
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
आगीची बातमी पसरताच ट्रेनमध्ये घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न गमावता आग विझवण्याचे काम सुरू केले. स्थानिक प्रशासनालाही त्वरित याची माहिती देण्यात आली आणि त्यांच्या मदतीने आग वेळेत नियंत्रणात आणली गेली.
advertisement
कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग इतर बोगींमध्ये पसरली नाही आणि एका मोठ्या अपघाताची शक्यता टळली. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने ट्रेनच्या सर्व बोगींची कसून तपासणी केली. तांत्रिक टीमने ट्रेनमध्ये कोणताही धोका नसल्याची खात्री केली. तपास पूर्ण झाल्यावर जनसेवा एक्सप्रेस पुन्हा सहरसा रेल्वे स्टेशनकडे रवाना करण्यात आली आणि ती निर्धारित वेळेवर सुरक्षित पोहोचली.
view commentsLocation :
Bihar
First Published :
October 25, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/देश/
Train Fire: मोबाईलमुळे धावत्या रेल्वेच्या डब्यानं घेतला पेट, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या


