UPSC मुलाखतीतील तो प्रश्न, ज्याचं उत्तर ऐकून पॅनेलही झालं थक्क, काय म्हणाली टॉपर शक्ती दुबे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
IAS Shakti Dubey UPSC Interview : सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू राउंड, कारण ह्याच फेरीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्व, निर्णयक्षमता आणि विचारशक्तीची खरी परीक्षा घेतली जाते. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असणार.
मुंबई : भारतातील युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस यांसारख्या प्रतिष्ठित पदांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. प्रीलिम्स, मेंस आणि इंटरव्ह्यू.
यापैकी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू राउंड, कारण ह्याच फेरीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्व, निर्णयक्षमता आणि विचारशक्तीची खरी परीक्षा घेतली जाते. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असणार. (IAS Shakti Dubey UPSC Interview)
असाच एक व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबे यांचा ही व्हायरल झाला आहे. त्यांनी युपीएससी 2023 मध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवत इतिहास घडवला. सात वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर त्यांनी हा मोठा टप्पा पार केला. या काळात त्यांनी अनेक मॉक इंटरव्ह्यू दिले, जेणेकरून अंतिम मुलाखतीत आत्मविश्वासाने उत्तर देता येईल.
advertisement
त्यापैकी एका मुलाखतीत त्यांना विचारला गेला अनोखा प्रश्न त्यामध्ये त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून संपूर्ण पॅनल देखील शॉक झालं. आता असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल.
एका मॉक इंटरव्ह्यू दरम्यान त्यांना विचारण्यात आलं, "तुमचा आवडता Quote कोणता आहे आणि तुम्ही तो आपल्या आयुष्यात कसा वापरता?"
या प्रश्नाचं उत्तर शक्तीने अतिशय सुंदर शब्दांत दिलं. त्यांनी सांगितलं “माझा आवडता Quote आहे ‘Cracks were the real weakness of those walls, and also cracks were the reason light entered.’ म्हणजेच ‘भिंतीतील दरार त्या भिंतीची कमजोरी दाखवतात, पण त्याच दरारांमधून प्रकाशही आत शिरतो.’
advertisement
शक्ती म्हणाली की, “आपल्या प्रत्येक कमकुवतपणामध्येही काहीतरी शिकण्यासारखं असतं. आपण त्या त्रुटींना स्वीकारून त्यातून ताकद निर्माण केली पाहिजे.”
युपीएससीच्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त माहितीचं परीक्षण होत नाही, तर उमेदवाराचा विचार करण्याचा दृष्टीकोन, प्रशासनिक समज आणि आत्मविश्वास तपासला जातो. या राउंडमध्ये करंट अफेअर्स, प्रशासन, पोलीस व्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, संविधान अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात.
advertisement
शक्ती दुबे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) मधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचं स्वप्न त्यांनी 2018 मध्ये पाहिलं आणि सात वर्षांच्या कष्टानंतर त्यांनी ते वास्तवात आणलं. आज त्या देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/देश/
UPSC मुलाखतीतील तो प्रश्न, ज्याचं उत्तर ऐकून पॅनेलही झालं थक्क, काय म्हणाली टॉपर शक्ती दुबे


