नवे उपराष्ट्रपती कोण? आता पुढे काय? 60 दिवसात निवडणूक बंधनकारक; हरिवंश सिंह यांच्याकडे राज्यसभेचा कारभार

Last Updated:

Who Will Be The Next Vice President: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात हालचाल सुरु झाली असून पुढील उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपल्या राजीनामा दिला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. राजीनामा देताना 74 वर्षीय जगदीप धनखड यांनी म्हटले की, भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीचा आणि या ऐतिहासिक टप्प्यावर झालेल्या अभूतपूर्व, झपाट्याने घडलेल्या विकासाचा साक्षीदार आणि सहभागी होणे, हे माझ्यासाठी गौरव आणि समाधानाची बाब ठरली आहे.
ते पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासातील या परिवर्तनशील काळात सेवा देणे हा एक खरा सन्मान होता. धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. यावर्षी मार्चमध्ये त्यांना हृदयाशी संबंधित त्रास झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात चार दिवस दाखल करण्यात आले होते.
उपराष्ट्रपती धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल आपल्या मनःपूर्वक कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यांनी नमूद केले की, पंतप्रधानांचा सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य होता. या पदावर असताना मला खूप काही शिकायला मिळाले. धनखड यांनी संसद सदस्यांकडून मिळालेल्या आपुलकी, विश्वास आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की, ही भावना मी कायम स्मरणात ठेवेन आणि हृदयात कोरून ठेवीन.
advertisement
आता पुढे काय? नवे उपराष्ट्रपती कोण?
उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय संविधानानुसार 60 दिवसांच्या आत उपराष्ट्रपती पदासाठी औपचारिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा – दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्य सहभागी होतात. प्रमाण प्रतिनिधित्व प्रणाली आणि एकल हस्तांतरणीय मतपद्धती यांचा या निवडणुकीत वापर केला जातो.
भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास राज्यसभेचे उपसभापती 'कार्यकारी सभापती' म्हणून जबाबदारी पार पाडतात. सध्या हरिवंश नारायण सिंह हे उपसभापती आहेत. सिंह यांची नियुक्ती ऑगस्ट 2022 मध्ये नियुक्ती झाली होती. धनखड यांच्या राजीनाम्यामुळे सध्या तात्पुरते हे कर्तव्य सिंह पार पाडतील.
advertisement
जगदीप धनखड यांचा राजकीय प्रवास
धनखड यांचा जन्म 1951 मध्ये झाला. त्यांनी 1989 मध्ये झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून 9व्या लोकसभेसाठी निवडणूक जिंकली. 1990 मध्ये ते संसदीय कार्य मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. यानंतर 1993 ते 1998 या कालावधीत त्यांनी अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. धनखड यांनी 30 जुलै 2019 ते 18 जुलै 2022 या कालावधीत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली.
view comments
मराठी बातम्या/देश/
नवे उपराष्ट्रपती कोण? आता पुढे काय? 60 दिवसात निवडणूक बंधनकारक; हरिवंश सिंह यांच्याकडे राज्यसभेचा कारभार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement