बापरे! काहीतरी भयंकर घडतंय, भारतात अनेक विमानं तडकाफडकी रद्द, असं अचानक काय झालं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Hayli Gubbi ज्वालामुखीच्या राखेमुळे दिल्ली-एनसीआरसह अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता खराब, विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली, DGCAने तातडीचे निर्देश जारी केले.
बापरे! काहीतरी भयंकरच घडतंय, सकाळी सकाळी हवेची गुणवत्ताही फार चांगली नव्हती आणि विमान उड्डाण करण्यात अनेक अडचणी येत आहे. हवेत काचांसारखा काही अंश, भयंकर राख हवेत पसरली आहे. जमिनीपासून जवळपास १० ते १५ किमी उंचीवर ही राख पसरलेली दिसत आहे, त्यामुळे विमान उड्डाण करण्यात अडचणी येत आहेत. अचानक हवा बदलल्याने अडचण झाली आहे. अनेक कंपन्यांनी विमानं रद्द केली तर काही विमानांचा मार्गच बदलला आहे.
जवळपास १० हजार वर्षांच्या शांततेनंतर, इथिओपियातील Hayli Gubbi या ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक झाला. त्याच्या राखेशी भरलेल्या ढगांमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर मोठे संकट आले आहे. ही राख आता पूर्वेकडे सरकत थेट दिल्ली-एनसीआर पर्यंत पोहोचली आहे. यामुळे याचा परिणाम विमान उड्डाणांवर झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विमानं रद्द केली आहेत. या धोकादायक परिस्थितीपासून वाचण्यासाठी डीजीसीएने DGCA तातडीने सर्व विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना काढली आहे.
advertisement
ज्वालामुखीच्या राखेच्या या घोंघावणाऱ्या वादळामुळे अनेक विमान कंपन्यांना आपले वेळापत्रक बदलावं लागलं. अकासा एअरने सुरक्षेचा उपाय म्हणून २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दा, कुवैत आणि अबू धाबीकडे जाणारी-येणारी आपली विमाने रद्द केली. इंडिगोनेही त्यांच्या काही फ्लाईट्स रद्द केल्याचे सांगितले आहे. एअर इंडियाच्या अनेक महत्त्वाच्या फ्लाईट्सवर याचा परिणाम झाला आहे. २५ नोव्हेंबरच्या चेन्नई-मुंबई, हैदराबाद-दिल्ली आणि मुंबई-कोलकाता मार्गावरील उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.
advertisement
या राखेमुळे विमानाचे इंजिन खराब होऊ शकते, त्यामुळे विमानाचे रूटिंग बदलण्याची आणि त्यानुसार फ्लाईटचे नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. 'तुमच्या प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे,' असे इंडिगोने प्रवाशांना कळवले आहे. तसेच, स्पाइसजेट आणि अकासा एअरने दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या विमानाच्या वेळेत बदल होतो का याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
डीजीसीएने सर्व विमानतळांना सल्ला दिला आहे की, जर राखेचा अंश आढळला, तर त्यांनी त्वरित रनवे, टॅक्सीवे आणि एप्रनची तपासणी करावी. ही राख पूर्णपणे साफ होईपर्यंत विमानांचे उड्डाण आणि टेकऑफ थांबवावे. याशिवाय, विमानतळ चालकांना Satellite Imagery आणि हवामान अंदाजाच्या आधारे राखेच्या हालचालीवर २४ तास बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता येईल.
advertisement
ज्वालामुखीच्या राखेच्या या दाट ढगांमुळे दिल्ली-एनसीआर मधील हवेची गुणवत्ता आणखी खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थानपासून ते दिल्लीपर्यंत याचा मोठा धोका आहे. तर महराष्ट्रातील हवेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता खराब होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे विमान सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 10:42 AM IST


