लोकसभेचे नवे अध्यक्ष कोण? आज चित्र स्पष्ट होणार, या दोन नावांची चर्चा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
लोकसभेचे नवे अध्यक्ष कोण असणार हे आज दुपारी बारापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली, प्रशांत लिला रामदास : लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठा धक्का बसला, तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. भाजपकडून लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पारचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएला 292 जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपला स्वबळावर संपूर्ण बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे सत्तास्थापनेमध्ये एनडीए आघाडीमधील घटक पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरली. सत्तास्थापनेनंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे लोकसभा अध्यक्षांच्या निवडीकडे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरला जाणार आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भापकडून प्रयत्न सुरू आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला आणि डी पुरांदेश्र्वरी यांची नावं चर्चेत आहेत. तर दुसरीकडे लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळावं अशी मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली आहे. जर उपाध्यक्षपद मिळालं नाही तर इंडिया आघाडी अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याची शक्यता आहे. लोकसभेचे नवे अध्यक्ष कोण असणार हे आज दुपारी बारापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान भाजपकडे सत्तास्थापनेसाठी स्वबळावर बहुमत नसल्यानं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव देखील चर्चेत होतं. जर टीडीपीचा उमेदवार दिला तर आम्ही पाठिंबा देण्यासाठी विचार करू असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र आता भाजपकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांचं नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
June 25, 2024 10:35 AM IST