Maharashtra Elections : महायुतीचे 'हरियाणास्त्र' मविआ उलटवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : हरियाणात विजय दृष्टीपथात असतानाही काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

महायुतीचे 'हरियाणास्त्र' मविआ उलटवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
महायुतीचे 'हरियाणास्त्र' मविआ उलटवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
मुंबई :  राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. जवळपास सगळ्याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडे जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. भाजप आणि महायुतीकडून मविआला पराभूत करण्यासाठी हरियाणा पॅटर्नची वापरणार असल्याची चर्चा सुरू आहे. हरियाणात विजय दृष्टीपथात असतानाही काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी आपल्यासोबतच्या घटक पक्षांसाठी अखेर काही जागा सोडणार आहे. यामुळे इतर मतदारसंघातील मविआच्या उमेदवारांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची मागील काही दिवसांपासून जागा वाटपावर चर्चा सुरू होती. अखेर मविआने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 85-85-85 असं जागा वाटप झाले असून १५ जागांवर तिढा असल्याचे सांगितले. तर इतर मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडीतील सहा छोट्या घटक पक्षांसाठी 18 जागा सोडण्याचे तीन पक्षांनी निश्चित केले आहे. यातील अधिक जागा मिळवण्यासाठी छोट्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस हे प्रमुख तीन पक्षांनी 288 पैकी 270 जागांवर आपले उमेदवार लढवणार आहे.
advertisement

घटक पक्षांची किती जागांची मागणी?

महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष यांना जागा सोडणार असल्याचे निश्चित केले आहे. या पक्षांसह इतर काही छोटे पक्ष आणि संघटना यांनी प्रागतिक पक्षांची आघाडी तयार केली आहे. या आघाडीने मविआकडे 38 जागांची मागणी केली आहे. मात्र, सुरुवातीच्या चर्चेनंतर प्रागतिक पक्षांच्या आघाडीने 20 जागांची मागणी केली आहे. यातील काही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सांगोलाच्या जागेवर शेकापचा आणि नाशिक पश्चिमवर माकपचा दावा आहे. या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाने उमेदवार दिले आहेत. शेकापने 4 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. समाजवादीने 5 जागा जाहीर केल्या आहेत. माकपने 5 जागांची तयारी केली असून एका ठिकाणी त्यांचा विद्यमान आमदार आहे. मात्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
advertisement

मविआ कसं करणार जागा वाटप?

लोकसभेला या घटक पक्षांना मविआने एकही जागा सोडली नव्हती. विधानसभेला सन्मानजनक जागा देण्यात येतील, असा शब्द मविआने दिला होता. आता छोट्या पक्षांना जागा देण्यासाठी मविआतील प्रमुख तीन पक्षांच्या जागा वाटपाच्या सूत्रात बदल होण्याची शक्यता आहे. छोट्या पक्षांमध्ये शेकाप 6, समाजवादी 5, माकप 4, भाकप 1 आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष 1 असे या 18 जागांचे वाटप होण्याची शक्यता आहे.
advertisement
मविआला फायदा काय?
या लहान पक्षांना जागा सोडल्याने मविआतील उमेदवारांना इतर जागांवर मतदानात फायदा होईल. त्याशिवाय, घटक पक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे आघाडीचा एकच उमेदवार असल्याने या 18 जागांवर विजयाची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे हरियाणा पॅटर्नला काही प्रमाणात निष्प्रभ करता येईल असे म्हटले जाते. या पक्षांना जागा सोडल्याने मविआ एकजूट असल्याचा संदेश लोकांपर्यंत जाईल. त्याचा फायदा मतदानांमध्ये होईल. त्याशिवाय हे घटक पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता शून्य असल्याने सत्ता स्थापन करण्यात आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही मविआकडे एक ठोस संख्याबळ कायम राहिल,  असा अंदाज आहे.
advertisement

 इतर महत्त्वाची संबंधित :

view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/Maharashtra Assembly Elections/
Maharashtra Elections : महायुतीचे 'हरियाणास्त्र' मविआ उलटवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement