सांगलीकरांनो लक्ष द्या! अतिवृष्टीमुळे कोकणात 'या' मार्गांवर धावणाऱ्या बसफेऱ्या रद्द, एसटी विभागाचा निर्णय
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणात ढगफुटीसदृश पाऊस आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील...
सांगली : राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणात ढगफुटीसदृश पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि राजापूर येथे प्रचंड पाऊस पडला आहे. या पार्श्वभूमीवर एसटीच्या सांगली विभागातून बससेवेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सांगली विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या बसेस वाशीपर्यंतच धावणार आहेत, तर चिपळूण आणि दापोलीकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
कोकणातील 'या' मार्गांवरील बसेस रद्द 
सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई महापालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईतील रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेलेले आहेत. या पार्श्वभूमीवल सांगलीच्या एसटी विभागाकडून कोकणात जाणाऱ्या बससेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत.
advertisement
पावसाचे अपडेट घेऊन पुढे निर्णय घेणार
सांगली एसटी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मिरज-मुंबई आणि सांगली-मुंबई ही एसटी बस वाशीपर्यंत गेली. त्याचबरोबर बुधवारी (20 ऑगस्ट) मुंबईकडे जाणाऱ्या बसेस वाशीपर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिपळूण आणि राजापूर तालुक्यातही अतिवृष्टी झाल्यामुळे मिरज-दापोली आणि कवठे महांकाळ-दापोली या बस रद्द करण्यात आल्या आहेत.  सांगली विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, मुंबईसह कोकणातील पावसाची अपडेट घेतली जात आहे. त्यानुसार पुढे निर्णय घेतले जातील.
advertisement
हे ही वाचा : मोठी बातमी! रत्नागिरीत ऑरेंज अलर्टने भीती, पावसाचा कहर; उद्या शाळा बंद, प्रशासन हाय अलर्टवर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2025 8:08 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
सांगलीकरांनो लक्ष द्या! अतिवृष्टीमुळे कोकणात 'या' मार्गांवर धावणाऱ्या बसफेऱ्या रद्द, एसटी विभागाचा निर्णय


