भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याने तोडले अकलेचे तारे, कर्नल सोफिया कुरेशींबद्दल संतापजनक वक्तव्य
- Published by:sachin Salve
Last Updated:
ऑपरेशन सिंदूरची प्रत्येक माहितीही कर्नल सोफिया कुरेशी यांनी जगाला दिली. अवघ्या जगाने याची दखल घेतली.पण भाजपच्या एका मंत्र्याने कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अभ्रद वक्तव्य केलं आहे.
इंदूर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरची प्रत्येक माहितीही कर्नल सोफिया कुरेशी यांनी जगाला दिली. अवघ्या जगाने याची दखल घेतली. पण भाजपच्या एका मंत्र्याने कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अभ्रद वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ऑपरेशन सिंदूरची ब्रिफिंग करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या धाडस आणि बहाद्दुरीला संपूर्ण समाज मन सॅल्युट करत आहे. पण कॅबिनेट मंत्री विजय शाह हे त्याला अपवाद ठरले. इंदुर इथं रायकुंडा गावामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात विजय शाह यांची जीभ घसरली.
ये घटिया नीच आदमी मध्यप्रदेश सरकार का भाजपा मंत्री विजय शाह है, भारत की बहादुर बेटी कर्नल सोफिया कुरैशी को पाकिस्तानियों की बहन बता रहा है।
2 शब्द इस नीचता के लिए? pic.twitter.com/fuIbIsHnP4
— Srinivas BV (@srinivasiyc) May 13, 2025
advertisement
काय म्हणाले विजय शाह?
"आमच्या बहिणींचं कुंकु ज्यांनी पुसलं, त्या कटे पिटे लोकांसाठी आम्ही त्यांचीच बहिण पाठवून त्यांची ऐशीच्या तेसी केली. दहशतवाद्चांचे कपडे काढून त्यांनी आमच्या हिंदू बांधवांना मारलं. पण मोदी तर त्यांचे कपडे काढू शकत नाही. पण त्यांच्या बहिणीने त्यांची ऐशीच्या तेसी करण्यासाठी आपल्याकडील विमानं तिकडे पाठवली. मोदी त्यांचे कपडे तर काढू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या समाजाची बहिण त्यांच्याकडे पाठवली, त्यांनी आपल्या बहिणींना विधवा केलं होतं, पण त्यांच्या समाजाच्या बहिणीनंं येईन त्यांना धडा शिकवला" असं म्हणत विजय शाह यांनी संतापजनक वक्तव्य केलं. पुढे त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सैन्य दलाचं यांचं कौतुक केलं. पण, जेव्हा आपल्या विधानामुळे वाद पेटला हे लक्षात आल्यावर दिलगिरीही व्यक्त केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 11:18 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याने तोडले अकलेचे तारे, कर्नल सोफिया कुरेशींबद्दल संतापजनक वक्तव्य