दिल्ली ब्लास्टचे मुंबई कनेक्शन उघड; Mumbai पोलिसांची मोठी कारवाई; 3 उच्चशिक्षित ताब्यात, तपासात थरारक माहिती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Delhi Red Fort Blast: दिल्ली कार स्फोट प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, मुंबई पोलिसांनी गुप्त कारवाई करून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एनक्रिप्टेड चॅट ग्रुप, शस्त्र हालचाल आणि डॉक्टरांच्या टेरर नेटवर्कचे धक्कादायक तपशील तपासात उघड होत आहेत.
मुंबई : दिल्लीतील कार ब्लास्ट प्रकरणाशी संबंधित तीन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला पाठवले जात आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त मोहिमेदरम्यान हे तिघे वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे सर्वजण मुख्य आरोपींशी सोशल मीडिया अॅप्लिकेशनद्वारे संपर्कात होते. विशेष म्हणजे हे तिघेही सुस्थित कुटुंबांतील आहेत. या मॉड्यूलचे मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद आणि डॉ. मुजम्मिल यांच्याप्रमाणे आहेत.
advertisement
दरम्यान तपासात उघड झाले आहे की दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या i20 कारचा चालक असलेला डॉ. उमर मोहम्मद गेल्या तीन महिन्यांपासून विशेष चिन्हांचा वापर करून एक एनक्रिप्टेड सिग्नल ग्रुप चालवत होता, जेणेकरून त्यांचे व्यवहार कोणत्याही देखरेखीपासून दूर राहतील. या गटात त्याने मुजम्मिल, आदिल राथर, मुजफ्फर राथर आणि मौलवी इरफान अहमद वाघे यांना सामील केले होते. हा ग्रुप आतल्या समन्वयासाठी मुख्य केंद्र म्हणून काम करत होता.
advertisement
तपासात मोठा टप्पा तेव्हा समोर आला जेव्हा डॉ. शाहीन शाहिद यांच्या कारमधून एक असॉल्ट रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले. तपासकांच्या मते ही शस्त्रे उमरने मिळवली आणि 2024 मध्ये कधीतरी इरफानकडे सुपूर्द केली. शाहीन यांनी यापूर्वी मुजम्मिलसोबत इरफानच्या खोलीत भेट दिली होती, तेव्हा त्यांनी हीच शस्त्रे पाहिल्याचा खुलासा झाला आहे. या मॉड्यूलसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांमध्ये शाहीन यांचे योगदान सर्वाधिक असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे.
advertisement
उमेदवारांची भरती हे काम इरफान पाहत होता. अटक करण्यात आलेले अरिफ निसार दर उर्फ साहिल आणि यासीर उल अशरफ यांना इरफाननेच या नेटवर्कमध्ये आणल्याचे समोर आले आहे. शस्त्रांच्या हालचालींचाही तपशील तपासात मिळाला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये आदिल आणि उमर यांनी काश्मीरमधील एका मशिदीत इरफानला भेटले आणि एका पिशवीत लपवलेली रायफल त्याच्याकडे ठेवून गेले. नंतर पुढील महिन्यातही आदिल रायफल घेऊन इरफानच्या घरी पोहोचला आणि त्याच दिवशी मुजम्मिल आणि शाहीनही त्या ठिकाणी आले. दुसऱ्या दिवशी आदिलने पुन्हा ते शस्त्र ताब्यात घेतले.
advertisement
तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे संपूर्ण जाळे अत्यंत शिस्तबद्ध आणि एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर चालणारे आहे, ज्यात निधी उभारणी, टार्गेटेड भरती आणि शस्त्र हाताळणीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. हे नेटवर्क फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले आहे, ज्याचा 9 नोव्हेंबरला भांडाफोड झाला होता. तेव्हा मुजम्मिलशी संबंधित भाड्याच्या खोल्यांमधून तब्बल 2,900 किलो स्फोटक आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.
advertisement
10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या कारचे चालक असलेले उमर आणि मुजम्मिल दोघेही अल फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉक्टर असल्याचे उघडकीस आले आहे. या स्फोटानंतर पोलिसांनी या मॉड्यूलशी संबंधित सर्व लोकांच्या शोधाला वेग दिला आहे. पुढील तपास सुरू आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
दिल्ली ब्लास्टचे मुंबई कनेक्शन उघड; Mumbai पोलिसांची मोठी कारवाई; 3 उच्चशिक्षित ताब्यात, तपासात थरारक माहिती


