Indian Army Recruitment: भारतीय सैन्य दलात भरतीची अधिसूचना प्रसिद्ध, 10वी 12वी तरूणांना नोकरीची संधी; अर्जाची लिंक बातमीत
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Indian Army Group C Recruitment: भारतीय सैन्य दलामध्ये नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेली ही नवीन भरती भारतीय सैन्य दलामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जात आहे.
देशभरामधील अनेक तरूणांना देशसेवा करण्याची फार इच्छा असते. अशा तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलामध्ये नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेली ही नवीन भरती भारतीय सैन्य दलामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जात आहे. भारतीय सैन्य दलातील इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅकेनिकल इंजिनियरिंग विभागामध्ये नोकर भरती सुरू आहे. कोणकोणत्या विभागामध्ये ही नोकरभरती केली जाणार आहे? जाणून घेऊया...
भारतीय सैन्य दलामध्ये 194 जागांवर भरती केली जाणार आहे. 15 हून अधिक वेगवेगळ्या पदांवर ही नोकरभरती केली जाणार आहे. इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II), इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II), टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II), इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक, व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle), टेलीफोन ऑपरेटर, मशिनिस्ट (Skilled), फिटर (Skilled), टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled), अपहोल्स्ट्री (Skilled), वेल्डर (Skilled), स्टोअर कीपर, निम्न श्रेणी लिपिक (LDC), फायरमन, कुक, ट्रेड्समन मेट, वॉशरमन या पदांवर भरती केली जाणार आहे.
advertisement
4 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ह्या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर आहे. 10वी, 12 वी आणि ITI अशी शैक्षणिक पात्रता या सर्व पदांची आहे. 18 ते 25 वर्षे इतकी वयोमर्यादा असून अनुसूचित जाती आणि जमाती सोबतच इतर मागास वर्गातील उमेदवारांनाही वयामध्ये सूट देण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे, ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर कोणत्याही उमेदवाराकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. सर्वांसाठी फ्री असणार आहे. अर्जाची PDF अर्जदारांना देण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यासाठी कोणकोणते डॉक्यूमेंट लागतात, याची माहिती अर्जदारांना जाहिरात PDF मध्ये मिळेल. शिवाय, अर्ज पाठवण्याचा पत्ता देखील देण्यात आला आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 08, 2025 8:21 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Indian Army Recruitment: भारतीय सैन्य दलात भरतीची अधिसूचना प्रसिद्ध, 10वी 12वी तरूणांना नोकरीची संधी; अर्जाची लिंक बातमीत