ब्रिटनचे PM अन् राणी मुखर्जीची भेट, यशराज स्टुडिओत झाला सुपरक्लायमॅक्स, Bollywoodला मिळाले सिनेमॅटिक सरप्राइज
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बॉलिवूडचा ग्लोबल कनेक्शन पुन्हा एकदा उजळणार आहे. यश राज फिल्म्स (YRF) या प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसने मोठी घोषणा केली आहे.
मुंबई : बॉलिवूडचा ग्लोबल कनेक्शन पुन्हा एकदा उजळणार आहे. यश राज फिल्म्स (YRF) या प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसने मोठी घोषणा केली आहे. याच निमित्ताने ब्रिटनचे PM यशराज स्टूडियोला भेट द्यायला आले होते. यावेळी त्यांनी राणी मुखर्जीचीही भेट घेतली.
2026 च्या सुरुवातीला यूकेमध्ये तीन मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होणार आहे. या प्रकल्पांमुळे ब्रिटनमध्ये तब्बल 30000 नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. म्हणजेच, फक्त सिनेमाच नाही तर अर्थव्यवस्थेलाही नवा वेग मिळणार आहे.
ही घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी स्वतः मुंबईत केली. त्यांनी यशराज स्टुडिओला भेट देऊन राणी मुखर्जी आणि यशराज कुटुंबाशी भेट घेतली. भारत दौऱ्यावर आलेल्या स्टारमर यांनी स्पष्ट केलं, "बॉलिवूड यूकेमध्ये परत येत आहे. ही भागीदारी रोजगार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक एकतेसाठी नवा अध्याय ठरणार आहे."
advertisement
यूके हा आधीच जगातील सर्वात मोठ्या फिल्म हबपैकी एक आहे. दरवर्षी 12 अब्ज पौंडांचे आर्थिक योगदान देणारा उद्योग, ज्यामध्ये 90 हजारांहून अधिक लोक काम करतात. आता यामध्ये भारताच्या फिल्म इंडस्ट्रीचा सहभाग वाढवला जाणार आहे.
यश राज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी म्हणाले, “यूके नेहमीच आमच्यासाठी खास राहिलं आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारख्या आमच्या आयकॉनिक फिल्मचे शूटिंग तिथे झाले. आता त्याच्या 30 वर्षांच्या निमित्ताने आम्ही पुन्हा यूकेत परततोय, हे आमच्यासाठी अतिशय भावनिक आहे.”
advertisement
या निर्णयामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना नवी दिशा मिळणार आहे. दोन्ही देशांतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते आता एकत्र येऊन जागतिक प्रेक्षकांसाठी कंटेंट तयार करतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ब्रिटनचे PM अन् राणी मुखर्जीची भेट, यशराज स्टुडिओत झाला सुपरक्लायमॅक्स, Bollywoodला मिळाले सिनेमॅटिक सरप्राइज