Manoj Jarange Patil: यांची बायको माझ्याकडे आली होती आणि..., मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना गाठलं खिंडीत, म्हणाले...
- Published by:Sachin S
Last Updated:
मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं. तर, जरांगेंनीही दोन्ही नेत्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
जालना : बीडमध्ये ओबीसी समाजाचा विराट मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं. तर, जरांगेंनीही दोन्ही नेत्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. धनंजय मुंडे यांची बायको माझ्याकडे आली होती, असं म्हणत धनंजय मुंडेंना थेट इशाराच दिला. तसंच, भुजबळ यांना माहीत आहे तो संपल्यात जमा आहे, नेतृत्व धनगर समाजाकडे जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाने भुजबळ यांचा जामीन रद्द करावा, आमच्यात दहशत पसरवत आहे, अशी मागणीच जरांगेंनी केली.
मनोज जरांगे धनंजय मुंडेंवर काय बोलले?
"मुंडेंची बायको करुणा मुंडे माझ्याकडे आली होती. संपलेल्यावर बोलू नये. आम्ही सुद्धा बसू तेव्हा भूमिका मांडू. मी मुख्यमंत्री यांच्या आईवर बोललो नाही तू पंतप्रधानाच्या आईवर काय बोलला होता दाखवू का काढून हे. त्याची जुनी रेकॉर्डिंग आहे. हे जमत का? फडणवीस याला विसरले का, तू माझ्या नादेला लागू नको, तुमच्यावर बोललो आहे. मr तुमच्या घराण्यावर नाही. तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललो आहे. याचीच बायको माझ्याकडे साथ द्या म्हणायला आली होती. 4 दिवस झाले त्या येऊन गेल्या पण कौटुंबिक प्रकरण असल्याने मी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. बाईच्या आडून मी वार करत नाही' असं म्हणत जरांगेंनी मुंडेंना इशारा दिला. तसंच, तुझा चष्मा तुलाच ठेव रक्ताने भरलेला आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंच्या चष्मा डॉयलॉगवर टोला लगावला
advertisement
"बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी तसंच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही त्यांची लढाई आहे. यात विशिष्ट जातीचे लोक जमवले, बाकी यांना काही करायचे नाही. ते कुठेही उतरले नाही काही फरक पडणार नाही. त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली आहे. भुजबळ वातावरण बिघडवत आहे, टाळ्या वाजवण्यासाठी तो तिथे आला आहे. भुजबळच्या नादाला लागू नका. मराठा किती आहे आम्हाला माहीत आहे त्याच्या आकडेमोडीवर कोण लक्ष देत.जीआर रद्द करण्यासाठी तुम्ही दहशत निर्माण करत असाल तर मराठ्यांना सुद्धा एकत्र येऊन तोडीस तोड यत्तर द्यावं लागेल.हीच पवित्र भूमी राज्याचा दिशादर्शक होऊ शकतो.याचं दंगली घडवण्याच स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही.
advertisement
भुजबळ अजितदादांना अडचणीत आणताय
'फडणवीस यांनी मराठ्यांच मन जिंकला आहे. फडणवीस यांच्या लक्षात आलं आहे त्याची औकाद किती आहे. त्या ग्राउंडवर आमची घोंगडी बैठक झाली आहे. फडणवीस आणि विखे,शिंदे अजितदादा यांना बदनाम करायचं आहे. याने अजित दादांना बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. याच्या सभेतून लक्षात आले आहे, त्यामुळे पवार यांनी याला बाजूला करावे. अजित पवारांनी बीड जिल्हा दुसऱ्याच्या हातात द्यावा. भुजबळांच्या दबावातून अधिकारी मुक्त झाले म्हणून ते प्रमाणपत्र वाटप करत आहे. आमचं रेकोर्ड असून सुध्दा आम्हाला मिळत नाहीये. आमच्या नेत्यांना तुम्ही बोलता. तुम्ही विखेंना बोलता, ते काही तुमचं आरक्षण रद्द करा यासाठी येत नाहीत. मराठ्यांच्या गरिबांच्या लेकरांना आरक्षण द्या म्हणून ते येतात. मराठ्यांना आरक्षण द्या म्हणायला विखे बाहेर येत आहे.
advertisement
विजय वडेट्टीवार यांनी भूमिका घ्यावी
view commentsओबीसी मेळाव्यात व्हिडीओ दाखवला आता विजय वडेट्टीवार यांनी पहिल्या भूमिकेवर यावे. भुजबळ राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करत आहे. धनंजय मंडेला माहीत नाही हा भुजबळ कधी याचा गेम करून जाईल. भुजबळ यांना माहीत आहे तो संपल्यात जमा आहे नेतृत्व धनगर समाजाकडे जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाने भुजबळ यांचा जामीन रद्द करावा,आमच्यात दहशत पसरवत आहे, अशी मागणीही त्यांनी केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 17, 2025 10:51 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil: यांची बायको माझ्याकडे आली होती आणि..., मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना गाठलं खिंडीत, म्हणाले...